शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षात पहिल्यांदाच 'असं' घडलं; लोकसभेत मोडला मनमोहन सिंग यांचा जुना रेकॉर्ड, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:53 IST

गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव वाचून दाखवला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. २००४ नंतर ही पहिली घटना आहे. जेव्हा संसदेत पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर न देताच प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जून २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गोंधळामुळे राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देऊ शकले नव्हते. पंतप्रधानांना त्यांचं म्हणणं मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे विना उत्तर राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज ७ वा दिवस आहे. या दिवशी लोकसभेत गोंधळातच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला. २००४ नंतर पुन्हा सभागृहाची परंपरा खंडित होत पंतप्रधानांच्या उत्तराविनाच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ आणि घोषणाबाजी यामुळे वारंवार सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात येत होते. ही परिस्थिती पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाची कार्यवाही स्थगित केली. गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव वाचून दाखवला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. यावेळीही विरोधी खासदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती.

लोकसभेत गदारोळ

गुरुवारी सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा काही वेळात इंडिया आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ज्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची संधीच दिली जात नाही असा विरोधकांचा आरोप आहे. २०२० मध्ये चीनशी झालेल्या संघर्षाबाबत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप लावले. सरकार आणि विरोधकांमधील हा वाद मंगळवारी आणखी चिघळला. त्यात काँग्रेसच्या ८ खासदारांचे गैरवर्तन केल्यामुळे अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आले. त्यानंतर सातत्याने विरोधी पक्षाकडून सभागृहात विरोध सुरू आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणावर त्यांचे उत्तर द्यायला तयार होते. त्यासाठी तयारी सुरू होती परंतु विरोधकांनी सुरुवातीपासून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभागृहात पंतप्रधान मोदींना घेरायचे हा काँग्रेसचा प्लॅन होता. त्याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. अनेकदा लोकसभा सचिवालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे पंतप्रधानांना सभागृहात बोलता आले नाही असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Parliament witnesses rare event: No PM's reply on President's address.

Web Summary : For the first time since 2004, Parliament passed a motion thanking the President without the Prime Minister's response due to opposition protests. Similar situation occurred in 2004 with Manmohan Singh. Disruption prevented PM Modi from addressing parliament, BJP alleges Congress planned to surround him.
टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा