"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:04 IST2025-12-10T17:59:27+5:302025-12-10T18:04:22+5:30
महत्वाचे म्हणजे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एसआयआर, मत चोरी आणि वंदे मातरम या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना भाजप खासदार कंगना रणौत यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली.

"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज भाजप खासदार अभिनेत्री कंगना रनौत यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. ईव्हीएम हॅकिंगसंदर्भातील आरोपांवर बोलताना, कंगनाने काँग्रेसवर बोचरा प्रहार केला, “काँग्रेसवाल्यांनो तुम्हाला कळतच नाहीये की, पंतप्रधान नरेंद्र मोदी EVM हॅक करत नाहीत, ते तर लोकांची मने हॅक करतात." एवढेच नाही तर, विरोधकांनी सभागृह चालू दिले नाही आणि विविध प्रकारचे डावपेच आखले, असेही कंगना म्हणाल्या. त्या लोकसभेत एसआयआरवरील चर्चेदरम्यान बोलत होत्या.
महत्वाचे म्हणजे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एसआयआर, मत चोरी आणि वंदे मातरम या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना भाजप खासदार कंगना रणौत यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली.
तत्पूर्वी, कंगना यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जर्मनी दौर्यावरून टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “मी त्यांच्या दौर्यांची माहिती ठेवत नाही. ना त्यांच्या काही बातम्या वाचते. त्यांच्या बातम्या निरुपयोगीच असतात. त्यांच्या चरित्रात काही ताकद नाही. यामुळे माझ्याकडे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे काही नाही.”
राहुल गांधी यांच्या जर्मनी दौऱ्यासंदर्भात भाजपने त्यांना “पर्यटन करणारे नेते” असे संबोधले आहे. ते सातत्याने परदेश दौऱ्यांवरच असतात आणि आपल्या राजकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. यावर काँग्रेसनेही, पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा उल्लेख करत पलटवार केला.