शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 06:49 IST

Lok Sabha Election Result 2024 Live: कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

नवी दिल्ली : सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उद्या उत्तर मिळेल.

एनडीए लोकसभेच्या ४००हून अधिक जागा जिंकणार, असा दावा भाजपने केला आहे, तर ‘एनडीए’ला सत्तेवरून दूर करून केंद्रात आम्हीच सरकार स्थापन करणार, असे ‘इंडिया’ सांगत आहे. कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल पडणार असून कोण विजयाचा गुलाल उधळणार हे आज स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकांची मतमोजणी होऊन  निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया समाप्त होणार आहे. यंदाच्या निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीए आघाडीच विजयी होणार, असा निष्कर्ष बहुतांश ‘एक्झिट पोल’मधून काढण्यात आला आहे; मात्र एनडीए लोकसभेच्या ४००हून अधिक जागा जिंकेल, हा दावा एक्झिट पोलपैकी बहुतांश एक्झिट पोलनी मान्य केलेला नाही. एनडीएला ३५०हून अधिक जागा मिळतील, या मताकडे एक्झिट पोलचा कल आहे. 

विविध एजन्सींकडून एक्झिट पोल तयार केले जातात. त्याद्वारे भाजपला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत इंडिया आघाडीने या पोलचे निष्कर्ष नाकारले आहे. इंडिया आघाडीला १४१ ते १६१च्या दरम्यान जागा मिळतील, असे या पोलमध्ये म्हटले होते. 

पंतप्रधानांनीही केला झंझावाती प्रचारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभा घेतल्या. त्यांनी झंझावाती निवडणूक प्रचार केला. इंडिया आघाडीतील घटक पक्ष देशात फुटीचे राजकारण करीत आहेत. ही तुकडे-तुकडे गँग आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

राहुल गांधी यांनी केले जोरदार प्रयत्नकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात प्रचारसभा घेऊन भाजप व एनडीएवर कडाडून टीका केली. निवडणुकांत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीला यश मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न केले. सत्तेत आल्यास आम्ही काय करणार यावर त्यांनी भर दिला.

आयोगाबद्दल प्रश्नविरोधकांनी निवडणूक प्रक्रिया, तसेच आयोगाच्या कार्यपद्धतीवर  प्रश्न विचारले. सत्ताधाऱ्यांबाबत आयोगाने पक्षपाती भूमिका घेतल्याची टीका ‘इंडिया’ने केली होती. हा आयोगाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला. 

आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेचाही निकाललोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या चार राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. आंध्र प्रदेश, ओडिशा येथील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या, मंगळवारी होणार असून, निकालही घोषित होतील.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस