शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:27 IST

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनील विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर विरोधकांवर मुस्लिमांचा मुद्दा आणल्याचा आरोप केला. अमित शहा म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनीच निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला आहे. ते म्हणत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे आम्ही पीओकेबद्दल बोलू नये. अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का?, असा सवालही अमित शाह यांनी केला. 

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले

अमित शहा म्हणाले, आम्ही अजिबात बोललो नाही. विरोधक आम्ही मुस्लिम पर्सनल लॉवर बोलू, असे म्हणत आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने त्यांनी त्यांचा आदर करावा, असे त्यांचे नेते सांगत आहेत. फारुख अब्दुल्ला म्हणत आहेत की, पीओकेबद्दल बोलू नका, कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या बलाढ्य देशाने अणुबॉम्बच्या भीतीने आपला प्रदेश सोडावा का?, असंही अमित शाह म्हणाले. 

या मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाच सवाल केले आहेत. 

१) राहुल गांधी यांना तिहेरी तलाक परत आणायचा आहे का?२)त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास आहे का?

३) ते 370 हटवण्याचे समर्थन करतात का?४) राहुल गांधी यांनी मुस्लिम पर्सनल लॉबाबत त्यांचे मत स्पष्ट करावे.५) ते जनतेला सांगतील का की ते राम मंदिराच्या दर्शनाला का गेले नाहीत? , हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधी