पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 03:31 PM2024-03-14T15:31:26+5:302024-03-14T15:32:00+5:30

Parneet Kaur Joins BJP: पतियाळाच्या काँग्रेस खासदार परनीत कौर भाजपमध्ये सामील झाल्या आहेत.

Lok Sabha Election 2024: shock to Congress in Punjab; Captain Amarinder Singh's MP wife Preneet Kaur joins BJP | पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार परनीत कौर (Parneet Kaur) यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये येण्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

पतियाळाच्या खासदार परनीत कौर, या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. पंजाबमधील 'रॉयल ​​सीट' पटियाला येथून त्या चार वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या की, 'मी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करत आहे. मी गेली 25 वर्षे लोकशाहीसाठी काम केले. यापुढेही करत राहीन. 

त्या पुढे म्हणाल्या की, 'पंतप्रधान मोदीजींचे कार्य आणि विकसित भारताच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण आपली मुले आणि देश सुरक्षित ठेवू शकतो. पीएम मोदी, जेपी नड्डा आणि भाजपचे आभार मानते.' दरम्यान, प्रतीन कौर यांना भाजप पटियालातून उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यापूर्वीच भाजपमध्ये आले
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आपल्या मुलांसह सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आपला पक्षदेखील भाजपमध्ये विलीन केला आहे. आता त्यांच्या पत्नीदेखील अधिकृतपणे भाजपमध्ये आल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2024: shock to Congress in Punjab; Captain Amarinder Singh's MP wife Preneet Kaur joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.