शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

‘मोदींची गॅरंटी’ हाच जाहीरनामा, निवडणुकीत महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांवर भाजप लक्ष केंद्रित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:56 IST

Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची गॅरंटी नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलेल्या चार वर्गांवर शेतकरी, महिला, युवक आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली -  भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची गॅरंटी नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलेल्या चार वर्गांवर शेतकरी, महिला, युवक आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, हा केवळ निवडणूक जाहीरनामा नसून २०४७ चा देशाचा रोड मॅपही असेल.

भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची पहिली बैठक केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात सोमवारी झाली. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मुद्दे समाविष्ट करण्यासाठी देशभरातील लाखो लोकांकडून मत मागविले होते. दोन महिन्यात भाजपला जाहीरनाम्यासाठी ३५ लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी हे भाजपच्या विजयाचे प्रमुख कारण असून, निवडणूक जाहीरनाम्याला मोदींची गॅरंटी असे नाव देण्यात यावे, असा या बैठकीतील सूर होता. जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कार्यावर विश्वास आहे, असेही अनेकांचे मत हाेते. 

शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचापासून मुक्त करणार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या दीडपट भाव देण्याच्या हमीबरोबरच त्यांना स्वस्त दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, पीक विम्याची हमी देणे आणि शेतकऱ्यांना सावकारांपासून मुक्त करण्याचे आश्वासनही देण्यात येणार आहे. 

२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशन मिळणार२०२९ पर्यंत गरिबांना मोफत रेशनची योजना सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्व गरिबांना कायमस्वरूपी घरे आणि १० लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमाअशी हमी या जाहीरनाम्यात दिली जाऊ शकते. 

२०४७चे व्हिजन असेल समाविष्ट- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि २०४७ पर्यंत देशाला पुढे नेण्याचे व्हिजन हे मोदी गॅरंटीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. - २०४७ साठी देशाचा रोड मॅप काय असेल ते मुद्देही मोदींच्या गॅरंटीत असतील. आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन,पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद,विनोद तावडे यांच्यासह निवडणूक जाहीरनामा समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.- समितीची पुढील बैठक लवकरच बोलाविली जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी