सनी देओलचा 'गड्डी लेकर' प्रचार; ट्रकवर बसून केला 'रोडशो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 17:50 IST2019-05-02T17:49:59+5:302019-05-02T17:50:10+5:30
सनी यांनी आपला रोड शो डेरा बाबा नानकपासून श्री गुरुद्वारा साहिबचे दर्शन करून असा केला. गुरुदासपूरमधील अनेक भागातून सनी यांचा रोड शो झाला. यावेळी सनी देओल ट्रकच्या छतावर बसून जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत होते.

सनी देओलचा 'गड्डी लेकर' प्रचार; ट्रकवर बसून केला 'रोडशो'
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे गुरुदासपूरमधील उमेदवार सनी देओल सध्या आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांनी नुकताच गुरुदासपूरमध्ये रोड शो केला. त्यांचा हा रोडशो एका कारणामुळे खास ठरला आहे. यावेळी सनी यांनी आपल्या गदर चित्रपटाची आठवण करून देत ट्रकच्या छतावर बसून रोड शो केला.
सनी यांनी आपला रोड शो डेरा बाबा नानकपासून श्री गुरुद्वारा साहिबचे दर्शन करून असा केला. गुरुदासपूरमधील अनेक भागातून सनी यांचा रोड शो झाला. यावेळी सनी देओल ट्रकच्या छतावर बसून जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत होते. जागोजागी सनी देओलचे स्वागत होत होते. परंतु, युवकांमध्ये सनी देओल यांच्याविषयी फारसा उत्साह दिसून आला नसल्याचे समजते.
सनी यांच्या रोड शोला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच पंजाबमधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा रोड शो होता, असा दावाही करण्यात आला आहे. यावेळी सनी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून तयार होत असलेल्या कॉरिडोरमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सनी देओल यांच्या रोड शोला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी सनीने जनतेशी संवाद साधला. तसेच २०१९ लोकसभा निवडणूक देशासाठी खास आहे. त्यामुळे गुरुदासपूरमधील जनतेने भाजपला विजय करून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सनी यांनी केले.