शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर - ममता बॅनर्जी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 8:42 AM

'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते.'

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

दरम्यान, काल लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, 'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू'. 

यंदाची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आज तक आणि एक्सिस माय इंडियाने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 19 ते 23 जागा मिळू शकतात. 

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 19 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसची फक्त एक जागा निवडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये यंदा कम्युनिस्टांना खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. तर तृणमूल काँग्रेसलाही 19च्या जवळपास जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचे सरकार येणार हे सांगितले जाते. 

निवडणूक प्रचारादरम्यान विविध संस्थांनी मतदारांमध्ये जात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष, उमेदवार यांचा विजय, पराभव याची गणिते मांडली जातात. सी-व्होटर, सीएसडीएस, नेल्सन, लोकनिती, चाणक्य यासारख्या संस्था ओपिनियन पोल घेत असतात. या संस्थांची आपली स्वत:ची टीम असते, जी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांची मते जाणून घेते.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीLok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019