शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

Lok Sabha Bypoll Results 2018: ...तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त 'इतक्या' जागा मिळतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 11:50 AM

उत्तर प्रदेशाताली स्थिती भाजपासाठी चिंताजनक

लखनऊ: लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये वारंवार स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवांमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा धुव्वा उडाला होता. त्यानंतर काल कैराना लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवारानं भाजपाला धूळ चारली. 2014 मध्ये नरेंद्र मोदींना केंद्रात पूर्ण बहुमत मिळवून देण्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. त्यावेळी भाजपानं उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता उत्तर प्रदेशातील स्थिती भाजपासाठी अनुकूल राहिलेली नाही. एबीपी न्यूजच्या आकडेवारीनुसार, आज लोकसभा निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाला 80 पैकी फक्त 19 जागा मिळतील. कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामींच्या शपथविधी दिसलेली विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ उत्तर प्रदेशातील कैरानातही दिसली. राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपा खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे मिळणारी सहानभूतीची मतंदेखील भाजपाला तारु शकली नाहीत. त्यामुळे भाजपाला कैरानात पराभूत व्हायला लागलं. 2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला उत्तर प्रदेशात 43 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला झालेल्या मतदानाची बेरीज 42 टक्के होते. याशिवाय काँग्रेसला 12 टक्के तर अन्य पक्षांना 7 टक्के मतं मिळाली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यास, उत्तर प्रदेशात भाजपाचे बुरे दिन आल्याचं चित्र दिसतंय. सध्याचा मतदानाचा पॅटर्न पाहता एनडीएला 35 टक्के मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मिळून 46 टक्के मतं मिळाली आहेत. यामध्ये काँग्रेसच्या 12 टक्के आणि इतर पक्षांच्या 3 टक्के मतांची भर पडल्यास हा आकडा थेट 60 टक्क्यांवर जातो. गेल्या चार वर्षांमधील आकडेवारी पाहिल्यास, भाजपाच्या मतांमध्ये 8 टक्क्यांची घट झालीय. मात्र याचवेळी विरोधक एकत्र येत असल्यानं त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ होतेय. त्यामुळे आज लोकसभेची निवडणूक झाल्यास आणि उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र लढल्यास भाजपाला 80 पैकी फक्त 19 जागांवर यश मिळेल आणि विरोधी पक्ष तब्बल 61 जागांवर विजयी होतील.  

टॅग्स :Lok Sabha Bypoll Results 2018लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीLoksabhaलोकसभाBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश