लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:14 AM2020-06-02T05:14:41+5:302020-06-02T05:14:57+5:30

सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत.

lockdown decision is terrible; Experts claim that corona is a mass infection | लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग काही दिवसांपासून सुरू झाला आहे, असा दावा प्रतिबंधक औषधे व संसर्गजन्य आजार या विषयातील तज्ज्ञांनी केला आहे. मात्र सामूहिक संसर्गाची सुरुवात झालेली नाही, या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे.


यासंदर्भात या तज्ज्ञांनी एका पत्रकात म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाने जोर धरला आहे. संसर्गजन्य आजार कसे फैलावतात याचे उत्तम ज्ञान असलेले अनेक तज्ज्ञ देशात उपलब्ध असून, त्यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केली होती का? तसे झाले असते तर या साथीचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करता आला असता. त्याऐवजी साथींच्या फैलावाचे अतिशय मर्यादित ज्ञान असलेल्या लोकांबरोबर चर्चा करून देशात लॉकडाऊन जाहीर करण्याचा भयंकर निर्णय केंद्र सरकारने घेतला.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आयपीएचए), इंडियन असोसिएशन आॅफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (आयएपीएसएम), इंडियन असोसिएशन आॅफएपिडेमिआॅलॉजिस्ट या तीन संस्थांनी हे संयुक्त पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे मानवी समस्या आणखी गुंतागुंतीच्या बनल्या. देशामधील कोरोना आजाराच्या फैलावाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती केंद्र सरकारने शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर व जनतेला दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी सरकारकडून पारदर्शक पद्धतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोरोनाच्या रुग्णांत कमी प्रमाणात लक्षणे दिसतात किंवा लक्षणेच आढळून येत नाहीत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घरातच थांबायला सांगून तिथे उपचार दिले पाहिजेत.

स्थिती आणखी चिंताजनक बनू शकते
संसर्गजन्य आजार व प्रतिबंधक औषधे या विषयातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना साथीचा प्रसार सुरू झाला त्या प्रारंभीच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली असती तर या साथीचा फैलाव खूपच कमी झाला असता. शहरांतून हे स्थलांतरित मजूर परतत असलेल्या ग्रामीण भागात आधीच पुरेशा आरोग्यसुविधा नाहीत. जर तिथे कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावला तर परिस्थिती आणखी चिंताजनक बनू शकते.

Web Title: lockdown decision is terrible; Experts claim that corona is a mass infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.