सुनेने लावली सासूची ऑनलाइन बोली

By Admin | Updated: November 26, 2015 21:31 IST2015-11-26T21:26:22+5:302015-11-26T21:31:05+5:30

घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरण आपण पाहिली असतीलच. मात्र याठिकाणी एका नाराज सुनेने आपल्या सासूची थेट ऑनलाइन सामानांची खरेदी-विक्री करणा-या वेबसाइटवर बोली लावल्याचे वृत्त आहे.

Listened to the listener list online | सुनेने लावली सासूची ऑनलाइन बोली

सुनेने लावली सासूची ऑनलाइन बोली

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - अनेक घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतीलच. अशाच घरातील एका एका नाराज सुनेने आपल्या सासूची थेट ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री करणा-या वेबसाइटवर बोली लावल्याचे वृत्त आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वस्तूंची खरेदी- विक्री करणा-या 'फायदा डॉट कॉम' या वेबसाइटवर सुनेने आपल्या सासूचा फोटो अपलोड केला असून फोटोसोबतच पोस्ट टाकली.  या पोस्टच्या टॅगलाइनमध्ये सुनेने 'Mother in -law in Good condition' असे लिहीले आणि याच्या मोबदल्यात तिने एका पुस्तकाची मागणी केली आहे, की त्या पुस्तकामुऴे आपल्या मनाला शांती मिळेल. याचबरोबर माझ्या सासूचा आवाज मोठा असून सतत भांडण करते. तसेच, मी बनविलेल्या जेवणात काहीतरी कमी असल्याचे सांगत असते, अशी पोस्ट या नाराज सुनेने आपल्या सासूबद्दल लिहीली. दरम्यान, ही पोस्ट ऑनलाइन टाकल्यानंतर वायरल झाली. त्यानंतर काही वेळातच 'फायदा डॉट कॉम' या वेबसाइटने ती पोस्ट काढून टाकली. 
 

Web Title: Listened to the listener list online