शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे वळविली पर्यटकांनी पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 6:02 AM

शेकडो टुर्स पॅकेज रद्द : व्यावसायिकही हादरले, पर्यटनावर परिणाम

संजय पाठक

नाशिक : काश्मीर खोऱ्यातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीचे वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टूर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनावर अवलंबून असणाºया अर्थकारणाचा दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेही पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४0 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे जाणाºया पर्यटकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मार्चपासून तेथे विशेष पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. पर्यटनाबरोबरच अनेक हनिमून पॅकेजेसही असतात. परंतु दहशतवादी घटना वाढत च्असतानाच, पुलवामामध्ये मोठा हल्ला झाल्याने पर्यटनक्षेत्र हादरले आहे. बहुतांशी पॅकेजेस पर्यटकांनीच रद्द केले असून, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्याही सहली रद्द करीत आहेत. तेथे पर्यटनासाठी जाण्याची आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे टूर्स कंपन्यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरला पर्याय म्हणून हिमाचल प्रदेश, उटी, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटकांना पाठविले जात असून, हा भाग सुरक्षित असल्याने पर्यटकांनाही त्याच पॅकेजमध्ये कमी-अधिक दर करून जाण्यास तयार होत आहेत. पर्यटनच थांबल्याने त्याचा मोठा फटका काश्मिरी नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.स्वत:हून टूर्स रद्दपर्यटनातून मिळणारा पैसा काश्मीरच्या विकासापेक्षा दहशतवाद्यांना मदतीसाठी होत असल्याची चर्चा सध्या व्हॉट््सअ‍ॅपवर सुरू असून, त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी काश्मीरला टूर्स नेऊच नये, असे आवाहनही केले आहे. त्यामुळे व्यावसायिकही स्वेच्छेने टूर्स रद्द करीत आहेत.- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिकमुंबईतून अनेक टुर्स व्यावसायिकांनी काश्मीरच्या सहली रद्द केल्या आहेत. माझ्याकडे हनिमून कपलसह अलीकडेच नोंदविल्या गेलेल्या तीन सहली रद्द झाल्या आहे. पर्यटकांमध्ये भीती असून, त्यामुळे ते टूर रद्द करीत आहेत. टूर्स व्यावसायिकही संबंधितांना स्वत:च्या जबाबदारीवर जावे लागेल, असे सांगत आहेत. पर्यटक तिथे अडकल्यास त्यांना परत आणणे ही मोठी जोखीम आहे.- दीपाली वागळे,ट्रॅव्हल्स व्यावसायिक, मुंबई 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला