लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:58 IST2025-10-04T05:58:16+5:302025-10-04T05:58:30+5:30

पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका) अंतर्गत अटक केल्याच्या विरोधात, त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Leh violence: Sonam Wangchuk arrested; wife moves court seeking justice | लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात

लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका) अंतर्गत अटक केल्याच्या विरोधात, त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यांची त्वरित मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे.

वकील विवेक तनखा व वकील सर्वम ऋतम खरे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल झाली असून, त्यात वांगचुक यांना ‘रासुका’खाली अटक करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांना तत्काळ न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश लडाख प्रशासनाला देण्याची मागणी गीतांजली जे आंगमो यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत, गृह मंत्रालय, लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लेहचे जिल्हाधिकारी आणि जोधपूर कारागृह अधीक्षक यांना पक्षकार करण्यात आले आहे. तसेच, वांगचुक यांच्या पत्नीला पतीशी फोनवर संवाद साधण्याची तसेच प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी देण्याचे प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली.

Web Title : सोनम वांगचुक गिरफ्तार; पत्नी ने अदालत में न्याय मांगा

Web Summary : सोनम वांगचुक की रासुका के तहत गिरफ्तारी के बाद पत्नी ने सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की। उन्होंने तत्काल रिहाई और गिरफ्तारी की वैधता को चुनौती दी। याचिका में वांगचुक की अदालत में पेशी और वैवाहिक संचार अधिकारों का अनुरोध किया गया है।

Web Title : Sonam Wangchuk Arrested; Wife Seeks Justice in Court

Web Summary : Sonam Wangchuk's wife petitions the Supreme Court after his arrest under the National Security Act (NSA). She seeks his immediate release and challenges the arrest's validity. The petition requests Wangchuk's court appearance and spousal communication rights, naming various administrative bodies as parties.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ladakhलडाख