शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीतील वकिलांचे कामबंद आंदोलन सुरूच; तारखा घेण्यासाठी जिल्हा न्यायालयांमध्ये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 18:25 IST

राजधानीतील सर्व सहा जिल्हा न्यायालयांमधील दहा हजार वकिलांनी सलग चौथ्या दिवशी कामबंद आंदोलन केले.

नवी दिल्ली : राजधानीतील सर्व सहा जिल्हा न्यायालयांमधील दहा हजार वकिलांनी सलग चौथ्या दिवशी कामबंद आंदोलन केले. तीन दिवस न्यायालयीन कामकाजाला फटका बसल्यानंतर गुरुवारी फिर्यादींना  पुढच्या तारखा घेण्यासाठी वकिलांनी न्यायालय परिसरात येऊ दिले. पण पोलीस-वकील संघर्षावर पडदा पडण्याऐवजी दररोज त्याला नवे कंगोरे प्राप्त होत आहेत. दोन दिवसांपूर्वी साकेत जिल्हा न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून फिर्यादींना माघारी पाठविणा-या वकिलांनी त्याच ठिकाणी गुलाबाचे फूल देऊन फिर्यादींचे स्वागत केले. साकेतसह तीस हजारी, कडकडडुमा, रोहिणी, पटियाला हाऊस आणि द्वारका या सहाही जिल्हा न्यायालयांमध्ये आज वकिलांनी शांततापूर्ण आंदोलन करताना पोलीस व फिर्यादींना परिसरात येऊ दिले. साकेत न्यायालयात बुधवारी वकील आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली होती. मात्र, आज वकिलांनी लोकांना कोर्ट रूममध्ये जाऊ दिले.याशिवाय सुनावणीला हजर राहून पुढची तारीख घेण्यासाठी वकिलांनी स्वत: ऐवजी दुस-या व्यक्तीला न्यायाधीशांपुढे पाठविले, अशी माहिती ऑल डिस्ट्रीक्ट कोर्टस् बार असोसिएशनच्या समन्वय समितीचे महासचिव डी. एस. कसाना यांनी सांगितले. जवळपास एक हजार वकील व फिर्यादींसाठी जेवणाची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली. साकेतप्रमाणे पटियाला हाऊसमध्येही पुढची तारीख घेण्यासाठी सुनावणीला लोकांना आत येऊ दिले जात आहे. नवी दिल्ली बार असोसिएशचे अध्यक्ष आर.के. वाधवा यांनी आज पटियाला हाऊस न्यायालयात पोलिसांना आत येण्यापासून रोखले नाही असे सांगितले. तर तीस हजार न्यायालय परिसरात आत येणाºया प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा तपासणी स्वत: आंदोलक वकीलच करीत आहेत. 

पोलिसांविरुद्ध याचिकातीस हजारीतील घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणा-या दिल्ली पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये धरणे देणा-या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबतच प्रकरण न्यायालयात असतानाही सोशल मिडीयावर वकिलांविरुद्ध पोस्ट टाकणा-या अधिका-यांवरही कारवाईची विनंती करण्यात आली आहे.

१४० कैदी न्यायालयीन कोठडीत होतेतीस हजारी न्यायालय परिसरात २ नोव्हेंबरला घटना घडली, त्यादिवशी उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर याच्यासह १४० कैदी न्यायालयीन कोठडीत होते, अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.