शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अन्य फास्ट फूडवरही कायद्याचा बडगा?

By admin | Updated: June 7, 2015 23:12 IST

नेस्लेच्या २ मिनिटात तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, येत्या काळात मॅगीपाठोपाठ अन्य ‘फास्ट फूड’ कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : नेस्लेच्या २ मिनिटात तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, येत्या काळात मॅगीपाठोपाठ अन्य ‘फास्ट फूड’ कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने रविवारी याबाबतचे संकेत दिले. दरम्यान, मॅगीच्या विक्रीवर गोव्यानेही बंदी लादली असून, अशी बंदी लादणारे हे देशातील ११ वे राज्य ठरले आहे.मॅगीपाठोपाठ अन्य फास्ट फूडवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याचीही शक्यता आहे. ‘आयुष’चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. मॅगीमध्ये शिसे आढळले होते आणि ते आरोग्यासाठी घातक होते. त्याचमुळे या उत्पादनावर बंदी लादण्यात आली. कदाचित अशीच अनेक उत्पादनातही हानिकारक पदार्थ असू शकतात. केवळ एका उत्पादनावर बंदी लादली आणि हा विषय संपला असे नाही, असे नाईक म्हणाले. तूर्तास मॅगीशिवाय अन्य अशी उत्पादने आढळलेली नाहीत. असे काही आढळताच ते जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी रविवारी मॅगी विक्रीवर बंदी जाहीर केली. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत मॅगीच्या नमुन्यांमध्ये कुठलेही हानिकारक पदार्थ आढळून आलेली नाहीत. मात्र तरीही देशभर मॅगीवर बंदी लादण्यात आल्याने आम्हीही कुठलीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पारसेकर पणजी येथे बोलताना म्हणाले. दरम्यान ‘दि कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स’ने आरोग्यमंत्री व ग्राहक व्यवहारमंत्र्यांना पत्र लिहून मॅगीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसडरविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)नेस्लेने जाहिरातीवर उधळले ४४५ कोटी; गुणवत्तेवर १९ कोटी> मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेबाबत नेस्ले इंडिया सध्या मोठमोठे दावे करीत असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. गतवर्षी नेस्ले इंडियाने जाहिरात आणि विक्री प्रचारावर ४४५ कोटी रुपये उधळले. याउलट आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि चाचण्यांवर नेस्ले इंडियाला केवळ १९ कोटी रुपये खर्च करावेसे वाटले.> गत पाच वर्षांतही नेस्ले इंडियाने जाहिरातींवर दरवर्षी सरासरी ३०० ते ४५० कोटी रुपयांचा खर्च केला. याउलट प्रयोगशाळा आणि गुणवत्ता चाचण्यांवर वार्षिक १२ ते २० कोटी रुपये खर्च केले.> नेस्ले इंडिया ही स्वीत्झर्लंडची बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेची भारतीय शाखा आहे. कंपनीच्या वार्षिक विवरणानुसार, गत पाच वर्षांत कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरील खर्चात ७५ टक्के वाढ झाली आहे. २०१० मध्ये हा खर्च ४४३ कोटी होता. २०१४ मध्ये तो वाढून ७५५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. कंपनीच्या जाहिरात आणि विक्री प्रचार खर्चातही ४७ टक्के वाढ झाली. २०१४ मध्ये ४४५ कोटी रुपये असलेला हा खर्च २०१० मध्ये केवळ ३०२ कोटी होता.