Laurene Powell Jobs : लॉरेन पॉवेल जॉब्स कुंभमेळ्यात पडल्या आजारी; काय होतोय त्रास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:28 IST2025-01-14T17:26:31+5:302025-01-14T17:28:16+5:30
Laurene Powell Jobs Health updates: अॅपलचे सह संस्थापक दिवगंत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत.

Laurene Powell Jobs : लॉरेन पॉवेल जॉब्स कुंभमेळ्यात पडल्या आजारी; काय होतोय त्रास?
Laurene Powell Jobs Latest News: उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे शहर असलेल्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत असून, या कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक दाखल झाले आहेत. या कुंभमेळ्यासाठी अॅपलचे सह संस्थापक स्व. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स याही आल्या आहेत. दरम्यान, त्या आजारी पडल्याची माहिती आता निरंजन पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांनी दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्वामी कैलाशानंद गिरी यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) सांगितले की, "त्या माझ्या शिबिरात असून, आराम करत आहेत. त्यांना अलर्जी झाली आहे. त्या कधीही इतक्या गर्दीच्या ठिकाणी गेलेल्या नाहीत. त्या खूप साध्या आहेत. पूजा करताना त्या आमच्यासोबत होत्या. आपली परंपरा लोकांना बघता आली नाही, ते सगळे आता यात सामील होऊ इच्छित आहेत."
लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी स्वामी कैलाशानंद गिरी यांना गुरू मानले आहे. स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली असून, गोत्रही दिले आहे. स्वामी कैलाशानंद गिरी यांनी लॉरेन पॉवेल जॉब्स यांना कमला हे नाव दिले आहे.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh: On former Apple CEO Steve Jobs' wife Laurene Powell Jobs, Spiritual leader Swami Kailashanand Giri says, "She is in my 'shivir'. She has never been to such a crowded place. She has got some allergies. She is very simple...All those people who… pic.twitter.com/1bQXP2lId7
— ANI (@ANI) January 14, 2025
लॉरेन पॉवेल जॉब्स या १५ जानेवारीपर्यंत निरंजनी आखाडा शिबिरातील टेंटमध्ये राहणार आहेत. त्यानंतर २० जानेवारी रोजी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला त्या हजर राहणार आहेत.