प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 08:02 IST2026-01-05T08:02:08+5:302026-01-05T08:02:08+5:30
हे जहाज औपचारिकपणे तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आले.

प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) सेवेत प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे जलावतरण करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) येथे हे जहाज औपचारिकपणे तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाने एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. हे दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी पहिले आहे. कोस्ट गार्डने या जहाजाची एक छोटी व्हिडीओ क्लिपही जारी केली.
हे जहाज आयसीजीच्या प्रदूषण नियंत्रण, अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणारे आहे. तेल गळती शोधण्यासाठी प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे.
तेल फिंगरप्रिंटिंग मशीन, गायरो-स्टेबलाइज्ड स्टँड ऑफ सक्रिय रासायनिक शोधक आणि पीसी लॅब उपकरणांनी सुसज्ज आहे. या जहाजामुळे सागरी प्रदूषणाशी लढण्याची भारताची क्षमता बळकट होईल आणि संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्याची देशाची वचनबद्धता बळकट होईल.