शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 07:27 IST

कृषी सोसायट्यांच्या ११ कोठारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सहकार क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ केला. ११ राज्यांतील प्राथमिक कृषी कर्ज सोसायट्यांच्या (पीएसी) ११ कोठारांचे उद्घाटन मोदी यांनी केले. या योजनेवर १.२५ लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत.

याच कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते आणखी ५०० सोसायट्यांच्या कोठारांच्या उभारणीसाठी कोनशिला समारंभही पार पडला. १८ हजार सोसायट्यांच्या संगणकीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही याप्रसंगी भाषण झाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ३० हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण केले जाईल. ६५ हजार सोसायट्यांच्या संगणकीकरणास मंजुरी देण्यात आली असून त्यावर २,५०० कोटी रुपये खर्च होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

गुजरातमध्ये  विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटनnदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार-रविवारी गुजरातेत आहेत. यावेळी ते देशभरातील ५२,२५० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि पर्यटन या क्षेत्रातील प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे. nराजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश), कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलगिरी (आंध्र प्रदेश) येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे (एम्स) उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राजकोटमधील एका कार्यक्रमात हा उद्घाटन समारंभ होईल.

संत रविदास यांना श्रद्धांजलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. संत रविदास यांच्या ६४७व्या जयंतीनिमित्त वाराणसीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभाला मोदी यांनी हजेरी लावली. एक्सवर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले की, ‘रविदास यांनी दिलेली समानता आणि सद्भावनेची शिकवण प्रत्येक पिढीला प्रेरित करते.रविदास हे दलितांमध्ये विशेषत्वाने पूजनीय आहेत. परमेश्वर एकच असल्याची त्यांची शिकवण आणि भेदभावाला विरोध करणारे त्यांचे विचार मोठ्या समुदायास आकर्षित करतात.’२७ रोजी मोदी केरळाततिरुवनंतपूरम : येत्या २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ दौऱ्यावर येणार आहेत. भाजपाच्या राज्य शाखेच्या पदयात्रेच्या सांगता समारंभास नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. 

आज आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत ७०० लाख टन धान्य साठवण क्षमता असलेले हजारो कोठारे व वखारी ५ वर्षांत उभारण्यात येतील. साठवण सुविधांअभावी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. आधीच्या सरकारांनी या समस्येकडे अजिबात लक्ष दिले नाही. आम्ही आता या समस्येची सोडवणूक करीत आहोत.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी