शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 11:13 PM

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे.

ठळक मुद्देलश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीतलश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहेअब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून पकडलाये टीआरएफचा हात

श्रीनगर : भारतावर भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांची आता आपसातच जुंपली आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सध्या आपसात भिडण्याच्या तयारीत आहेत. लश्कर-ए-तैयबाने 'द रेजिस्टंस फ्रंट' (टीआरएफ) नावाने एक नवी संघटना तयार केली आहे. यानंतर हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर असलेल्या अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडून, टीआरएफचा हात पकडला. यामुळे टीआएफ आणि लश्कर आता हिजबुलच्या निशाण्यावर आहे.

यासंदर्भात तहरीक-ए-पीपल्स पार्टीने शुक्रवारी हाताने लिहिलेले एक पोस्टर जारी केले आहे. यात, त्यांचा ऑपरेशनल कमांडर अब्बास शेखने हिजबुलची साथ सोडली असल्याचे लिहिले आहे. तसेच अब्बासचा, कश्मिरी पोलीस आणि सामान्य नागरिकांना मारण्यास विरोध होता, असेही  यात म्हणण्यात आले आहे.

खूशखबर...कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात आलेली महिला म्हणाली, 'Doing Fine'!

अब्बास 'अंडरग्राउंड' -

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास दावा करतो की, 12 सक्रिय सदस्य आणि अनेक स्थानिक लोक त्याच्या सोबत आहेत.

आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ -

टीआरएफनेही, इस्लामिक जिहादी लोकहो आणि 'रेजिस्टंट टिल व्हिक्ट्री' या पंचलाइनने एक पत्र जारी केले आहे. यात, 'काही दिवसांपूर्वीच आम्ही हिजबुल मुजाहिदीनला इशारा दिला होता, की त्यांनी काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मारणे बंद करावे. मात्र, त्यांनी शोपियांमधून जम्मू-काश्मीरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले. हिजबुल मुजाहिदीनला समजायला हवे, की आपली लढाई भारतीय संरक्षण दलाशी आहे. कश्मिरी लोकांशी नाही. आश्मिरी लोक आपलेच आहेत. आपण त्यांच्या सहकार्याशिवाय संरक्षण दलाशी लढू शकत नाही. आम्ही विचार केला होता, कीआपण एकत्रितपणे लढू मात्र ही आमची मोठी चूक होती,' असे टीआरएफने म्हटले आहे.

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

तसेच जे काश्मीरमधील लोकांना त्रास देतील त्यांच्याशी आम्ही लढू. हिजबुलला हा अखेरचा इशारा आहे. आम्हाला मजबूर करू नका. यानंतर कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. केवळ अॅक्शन घेतली जाईल, असेही टीआरएफने म्हटले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादIslamइस्लामMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस