शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:55 IST

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी चौघांचा गौरी लंकेश आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात थेट सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत कर्नाटक एसआयटी आली आहे.

कोल्हापूर - कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी चौघांचा गौरी लंकेश आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात थेट सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत कर्नाटक एसआयटी आली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती तेथील माध्यमांनी जाहीर केली. मात्र
त्याला कर्नाटक पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
कलबुर्गी आणि पानसरे यांचा खून एकाच पिस्तुलाने झाल्याचा संशय पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. त्यामुळे लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागल्यास त्यातून पानसरे यांच्या खुनाचीही उकल होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हुबळीचा गणेश मिस्कीन (वय २७) हा लंकेश यांच्या खुनावेळी मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून तो एसआयटीच्या अटकेत आहे. ज्या चौघांचा खुनातील सहभाग स्पष्ट होत आहे, त्यातील एक महाराष्ट्रातील असल्याचे समजते.
तेथील एसआयटीने त्याबाबतचा अहवाल सीआयडीला दिला आहे आणि असा अहवाल मिळाल्याच्या वृत्ताला कर्नाटक सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक केएसआर चरनेदी यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही खुनांची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या खून प्रकरणात एकाच विचाराच्या व्यक्ती असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता. तपासातून सध्या ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्यातून हीच लिंक स्पष्ट होत असल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे.
या चारही विचारवंतांच्या हत्या एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन केल्याचा दावा सुरुवातीपासून केला जात होता. त्यातील शस्त्र एकसारखे असल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे होते. ज्या वेळी टप्प्याटप्प्याने हत्या प्रकरणातील व्यक्तींना अटक करण्यात आली, तेव्हा त्यातील समान दुवे मिळत गेले. या आरोपींनी दिलेल्या माहितीतूनच नालासोपाºयातील वैभव राऊतचे नाव पुढे आले आणि तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्रात छापे मारण्यात आले.

१२ जण अटकेत

या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ‘ककोका’ कायद्यांतर्गत १२ जणांना अटक केली आहे. त्यातील पुरुषोत्तम वाघमारे याने पिस्तूल चालवल्याचा आरोप आहे. पुण्यातून अमित काळे, गोव्यातून अमित डेगवेकर यांच्यासह सुचितकुमार, केटी नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यातील खुनाची कबुली दिलेल्या चौघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेश