‘Lakshmanrekha’, the role of Congress is clear; Pradyut Bordoloei responds to BJP's criticism | ‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर

‘लक्ष्मणरेखा’ आखली, काँग्रेसची भूमिका स्पष्ट; प्रद्युत बाेरडाेलाेई यांचे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर

गुवाहाटी : जातीय पवित्रा टाळण्यासाठी आसाममध्ये ‘लक्ष्मणरेखा’ आखण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेआसाममध्ये माैलाना बदरुद्दीन यांच्या ‘एआययूडीएफ’साेबत आघाडी केली आहे. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे खासदार व प्रचार प्रमुख प्रद्युत बाेरडाेलाेई यांनी सांगितले की, आघाडीत ‘एआययूडीएफ’ हा एक पक्ष आहे. (the role of Congress is clear; Pradyut Bordoloei responds to BJP's criticism)

आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले. या आघाडीवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली हाेती. ‘एआययूडीएफ’ जातीयवादी असल्याची टीका भाजपने केली हाेती. त्यास बाेरडाेलाेई यांनी प्रत्युत्तर दिले. ‘एआययूडीएफ’ हा जातीयवादी पक्ष असल्याचे आम्ही कधीही म्हटले नसून अजमल हे त्यांच्या समुदायाच्या उत्थानाबाबत बाेलत असतात. 

यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये -
- कोलकाता : मोदी सरकारचे प्रखर टीकाकार व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

- कंदाहार येथे १९९९ अपहरण झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी अतिरेक्यांकडे ओलीस राहण्याची तयारी ममता बॅनर्जी यांनी दर्शविली होती, असा गौप्यस्फोटही यशवंत सिन्हा यांनी केला. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Lakshmanrekha’, the role of Congress is clear; Pradyut Bordoloei responds to BJP's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.