"रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्..."; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 03:29 PM2021-06-13T15:29:52+5:302021-06-13T15:52:50+5:30

Smriti Irani : पीडित महिलेच्या मुलीने अमेठी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. 

lady alleged his mother was raped when she was admitted for treatment in hospital | "रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्..."; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार

"रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्..."; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार

Next

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. लखनऊच्या डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमधील स्टाफवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दुष्कृत्य आणि मारहाणीसारखे आरोप केले आहेत. घाबरलेल्या या महिलेने आपल्या कुटुंबीयांना हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. यानंतर पीडित महिलेच्या मुलीने अमेठी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. 

स्मृती इराणी या दौऱ्यावर असताना रडत रडत एक मुलगी त्यांच्याकडे आली आणि माझ्या आईसोबत दुष्कृत्य झालं आहे असं सांगू लागली. यानंतर स्मृती इराणींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेठीतील एका 40 वर्षीय महिलेची प्रकृती खराब झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी महिलेला एका जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची तब्येत ढासळल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर कुटुंबीय रुग्णाला घेऊन याठिकाणी दाखल झाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तपासणीत महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.  

कोरोना रुग्णालय असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना रूग्णासोबत राहण्यापासून रोखले. बर्‍याच विनंत्यांनंतर जेव्हा त्यांना रुग्णाला भेटण्याची परवानगी दिली गेली तेव्हा महिलेची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी तिला मारहाण केली, असं या महिलेने सांगितले. तिच्यावर अत्याचारही करण्यात आले. या घटनेने महिला भयभीत झाली होती. घाबरलेल्या कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी डिस्चार्ज घेत महिलेला गौरीगंज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले. महिलेच्या मुलीने रडत रडत स्मृती इराणी यांच्याकडे न्यायाची मागणी केली. यानंतर इराणी यांनी कारवाईचे निर्देश दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माता न तू वैरिणी! आई 4 दिवस करत राहिली दारू पार्टी; भुकेने तडफडून चिमुकल्याचा पाळण्यातच मृत्यू

रशियामधील एका 25 वर्षीय महिलेने दारू पार्टीच्या नादात आपल्या मुलांकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी एका महिलेने आपल्या 11 महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षांचा मुलीला घरात एका खोलीत बंद केले. चार दिवसांपासून भुकेने व्याकूळ असलेल्या मुलाचा अखेर पाळण्यातचं मृत्यू झाला, तर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रशियाच्या ज्लाटाउस्टमधील 25 वर्षीय महिला ओल्गा बाजरोवा आपल्या पतीपासून वेगळी राहते. आपल्या मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दारात ढकल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. ती आपला 11 महिन्यांचा मुलगा सेवली आणि 3 वर्षांचा मुलीला घरातच बंद ठेवून पार्टीला गेली. चार दिवस दोन्ही मुलं घरात बंद होते. याच दरम्यान, ओल्गाने आपली मुल कोणत्या अवस्थेत आहेत याची साधी चौकशी देखील केली नाही. पार्टी करून ती जेव्हा घरी आली तेव्हा मुलांची अवस्था पाहून तिला धक्काच बसला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lady alleged his mother was raped when she was admitted for treatment in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app