शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 16:05 IST

Ladakh People Protest: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे.

Mallikarjun Kharge on Ladakh: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. विरोधकही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांनी लडाखच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. 

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये सहाव्या अनुसूची अंतर्गत राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने होत आहेत. राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी लडाखच्या नागरिकांकडून होत आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. एक जम्मू-काश्मीर तर दुसरे लडाख. आता या प्रेदशाला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

काँग्रेस अध्यक्षांचे ट्विट:-

मोदींची गॅरंटी सर्वात मोठा विश्वासघात : खरगेमल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "लडाखमध्ये राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी समुदायांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीला जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. पण इतर सर्व गॅरंटीप्रमाणे, लडाखच्या लोकांना घटनात्मक अधिकार सुनिश्चित करण्याची 'मोदींची गॅरंटी' हा मोठा विश्वासघात असून, ही चायनीज गॅरंटी आहे."

चिनी सैन्याचा आपल्या भागात कब्जा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "मोदींना, आपल्या मित्र्यांना लडाखच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या हिमालयीन नद्यांचा फायदा मिळवून द्यायचा आहे. गलवान व्हॅलीत आपल्या 20 जवानांच्या बलिदानानंतर मोदींनी चीनला क्लीन चीट दिली. यामुळे चीनच्या विस्तारवादाला प्रोत्साहन मिळाले आहे. एकीकडे मोदी सरकारने आपली प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, तर दुसरीकडे लडाखमधील आपल्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर आक्रमण सुरू आहे. 2014 पासून भारत आणि चीनच्या 19 बैठका झाल्या, तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे. चीनने डेपसांग मैदाने, हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा भागात कब्जा केला आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाहLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सBJPभाजपाcongressकाँग्रेसladakhलडाख