कुवेतमध्ये विविध घटनांमध्ये प्राण गमावलेल्या २० भारतीय नागरिकांचे पार्थिव अखेर मंगळवारी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. पश्चिम आशियातील तणावपूर्ण वातावरण आणि विमान सेवांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे हे मृतदेह भारतात आणण्यास बराच विलंब झाला होता.
कुवेत एअरवेजच्या 'KU5632' या विशेष विमानाने हे पार्थिव कोलंबोमार्गे कोची येथे आणले. विशेष म्हणजे या विमानात एकही प्रवासी नव्हता, हे विमान केवळ मृतदेह आणण्यासाठीच चालवण्यात आले होते.
विलंबाचे कारण काय?मिळालेल्या माहितीनुसार, या मृतदेहांचा तेथे सुरू असलेल्या युद्धाशी थेट संबंध नाही. मात्र, इराण-इस्रायल किंवा इतर प्रादेशिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. कागदपत्रांची पूर्तता आणि विमानांची अनुपलब्धता यामुळे या भारतीयांचे पार्थिव कुवेतमध्येच अडकून पडले होते.
परिजनांचा आक्रोश; रुग्णवाहिकांची सोयविमानतळावर पार्थिव पोहोचल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तातडीने पुढील सोपस्कार पूर्ण केले. मृत व्यक्तींमध्ये बहुतांश लोक केरळमधील कोझिकोड, अलप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी होते. तसेच काही मृतदेह रस्तेमार्गे तामिळनाडूला पाठवण्यासाठी रुग्णवाहिकांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियजनांचे पार्थिव मिळाल्याने विमानतळ परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण होते.
Web Summary : Twenty bodies of Indians who died in Kuwait have arrived in Kochi, Kerala. Flight delays, due to tensions in West Asia, caused the delay. The special flight carried only bodies. Families mourned as remains were transported to Kerala and Tamil Nadu.
Web Summary : कुवैत में मरने वाले 20 भारतीयों के शव कोच्चि, केरल पहुंचे। पश्चिम एशिया में तनाव के कारण उड़ान में देरी हुई। विशेष विमान में केवल शव थे। परिजनों ने शोक व्यक्त किया क्योंकि शवों को केरल और तमिलनाडु ले जाया गया।