शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

काँग्रेस सरकार अल्पमतात, जाणून घ्या मध्य प्रदेशमधील 'नंबर गेम'  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 4:05 PM

मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यांची संख्या 230 आहे. त्यापैकी राज्यातील 2 आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या 228 वर येऊन पोहोचली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 20 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे, मध्य प्रदेशमधील राजकारणाची नवी समिकरणं कशी? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. आकड्यांचा खेळ करुन भाजपा सत्ता स्थापन करणार करेल, असेच दिसून येतंय. 

'शिंदे तो झाँकी है, सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है'

मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यांची संख्या 230 आहे. त्यापैकी राज्यातील 2 आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या 228 वर येऊन पोहोचली आहे. काँग्रेसकडे 114 आमदारांचे संख्याबळ असल्याने 115 आमदारांचे संख्याबळ देऊन काँग्रेसने बहुमत सहजच सिद्ध केलं. काँग्रेसला 6 आमदराचे समर्थन मिळाले, त्यामुळे काँग्रेस आघाडीची संख्या 121 वर पोहोचली होती. त्यावर, काँग्रेसने सरकार बनवले. तर, भाजपाकडे 107 आमदार होते. भाजपाला सत्तास्थापनेसाठी 8 आमदार कमी पडत होते. त्यामुळे भाजपाला विरोधी पक्षात जावे लागले.  

राजीनाम्यानंतरकाँग्रेसच्या 20 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा सदस्यांची संख्या 208 वर पोहोचली आहे. त्यामुळे, बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला 105 आमदारांची गरज आहे. तर, भाजपाकडे स्वत:चे 107 आमदार आहेत. त्यामुळे राज्यपालांचे आमंत्रण मिळताच, भाजपा मध्य प्रदेशमध्ये आपलं सरकार स्थापन करू शकते. त्यानंतर, सहजपणे विधानसभेत बहुमत सिद्ध केलं जाईल.

 

अपक्ष आमदारांचे समर्थनसध्या राज्यातील 4 अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. मात्र, सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे दिसून येताच, या चारही आमदरांचा भाजपाला पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे भाजापाचे संख्याबळ 111 होईल. त्यानंतर, सत्ता टिकविण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाला 22 जागांपैकी केवळ 6 जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे. जर अपक्षांचे समर्थन भाजपाला मिळाले नाही, तर भाजपाला 10 जागांवर विजय मिळवावा लागेल. 

जर काँग्रेसला सरकार स्थापन करायचे असेल तर, पोटनिवडणुकीत काँग्रेसला 22 पैकी 21 जागांवर विजय मिळवावा लागेल. मात्र, राजीनामा दिलेले आमदार भाजपाकडून निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, काँग्रेसला हा विजयी आकडा गाठणे अतिशय अवघड दिसून येतंय. काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन 96 वर पोहोचली आहे. जर अपक्ष आमदारांनी समर्थन दिले, तर काँग्रेसला 18 जागांवर विजय मिळवावा लागेल. दरम्यान, शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. तर, शिंदे तो झाँकी है, पायलट और देवरा अभी बाकी आहे, असे मेसेजही पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशMLAआमदार