देशातील सर्वात जलद रेल्वेला 29 डिसेंबरला मोदी दाखवणार हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:20 AM2018-12-20T10:20:44+5:302018-12-20T10:22:44+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जलद रेल्वे असलेल्या 'टी-18'ला 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणार आहेत.

know all about the country fastest train t 18 pm modi will inaugrate it on 29th december | देशातील सर्वात जलद रेल्वेला 29 डिसेंबरला मोदी दाखवणार हिरवा कंदील

देशातील सर्वात जलद रेल्वेला 29 डिसेंबरला मोदी दाखवणार हिरवा कंदील

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जलद रेल्वे असलेल्या 'ट्रेन-18'ला 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणारमोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून ही ट्रेन पहिल्यांदा धावणारदेशातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन शताद्बी मेलची जागा घेणार

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जलद रेल्वे असलेल्या 'ट्रेन-18'ला 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणार आहेत. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून ही ट्रेन पहिल्यांदा रवाना करण्याचीही शक्यता आहे. देशातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन शताद्बी मेलची जागा घेणार असून, ही एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावणार आहे.

टी 18 या रेल्वेच्या निर्माणासाठी आयसीएफ चेन्नईनं 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. जी भारतातील सर्वाधिक जलद गतीनं धावणारी ट्रेन आहे. दिल्ली-वाराणसी मार्गावर ही ट्रेन धावणार असून, या एक्स्प्रेसची गती प्रतितास 180 किलोमीटर आहे. या ट्रेनमध्ये दोन विशेष डबे राहणार असून, ते 52-52 जागांमध्ये विभागले आहेत. तर उर्वरित डब्यात 78-78 जागा असतील. ट्रेन टी 18ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पीयूष गोयल यांनी अशाच प्रकारच्या चार ट्रेन तयार करण्याचा उद्देश व्यक्त केला आहे. 

देशातील पहिली इंजिन नसलेली सेमी हाय-स्पीड ट्रेन टी-18 दिल्ली-भोपाळ मार्गावर धावणार आहे. इंटरसिटी प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या या ट्रेनचा स्पीड प्रतितास 160 ते 180 किलोमीटर आहे. ही ट्रेन पूर्णतः वातानुकूलित आणि चेअरकार कोचची आहे. भारतीय रेल्वेसाठी ही ट्रेन गेमचेंजर ठरणार आहे. या ट्रेनमध्ये 2 एक्झिक्युटिव्ह, 14 नॉन एक्झिक्युटिव्ह क्लास असे मिळून 16 डबे आहेत. ज्यात 128 प्रवासी बसण्याची आसन व्यवस्था आहे. सर्व डबे एकमेकांशी जोडलेले आहेत.

तसेच ट्रेनची खिडकीही अशा पद्धतीनं तयार करण्यात आली आहे की, तुम्ही प्रवासादरम्यान बाहेर पाहू शकता. तसेच या ट्रेनची सीट्स 360 अंशांमध्ये फिरू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यामध्ये वाय-फायची व्यवस्था करण्यात आली आहे. टी-18 ट्रेनमध्ये वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: know all about the country fastest train t 18 pm modi will inaugrate it on 29th december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.