कुरुल येथे कालिदास जयंतीनिमित्त कविसंमेलन

By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30

कुरूल : महाकवी कुलगुरू कालिदासांच्या जयंतीनिमित्त आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवोदित कवींचे कविसंमेलन पार पडले़

Kisimanamitra for the Kalidas Jayanti at Kurul | कुरुल येथे कालिदास जयंतीनिमित्त कविसंमेलन

कुरुल येथे कालिदास जयंतीनिमित्त कविसंमेलन

रूल : महाकवी कुलगुरू कालिदासांच्या जयंतीनिमित्त आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवोदित कवींचे कविसंमेलन पार पडले़
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस़एस़जगताप होते़ तर भीमा कारखान्याचे संचालक चंद्रसेन जाधव, पर्यवेक्षक खंदारे, प्रा़ ज्ञानेश्वर जाधव, पतसंस्थेचे सल्लागार डॉ़ दत्तात्रय कदम, अर्जुन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते़
यावेळी कवी हणमंत राऊत, रवींद्र जगताप, परमेश्वर झिंजुर्डे, अभिजित माने, रोहित रणदिवे, शीतल आदलिंगे, प्रदीप गुरव, काजल राऊत यांनी कविता सादर केल्या़ यावेळी परिसरातील कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: Kisimanamitra for the Kalidas Jayanti at Kurul