सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:30 IST2024-11-20T13:29:07+5:302024-11-20T13:30:37+5:30
Mainpuri Girl Murder case: मृत तरुणीच्या वडिलांनी आणि आईने सपाच्या गुंडांचे नाव घेत त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे.

सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये एका तरुणीची पोटनिवडणूक काळात हत्या करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी सपाला या कुटुंबाने मतदान करण्यास नकार दिला म्हणून मुलीची हत्या केली आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी आणि आईने सपाच्या गुंडांचे नाव घेत त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे.
अखिलेश यादव यांचा पक्ष समाजवादी पक्षाचे समर्थक प्रशांत यादव आणि त्यांचे काही सहकारी आले होते. त्यांनी आम्हाला सपाला मतदान करण्यास सांगितले. यावर आम्ही भाजपाचे समर्थक आहोत असे त्यांना सांगत सपाला मतदान करण्यास नकार दिला. यानंतर आज मतदानानंतर मुलीची हत्या करण्यात आल्याचे मृत तरुणीच्या आई वडिलांनी सांगितले. या तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. पिडीतेचा मृतदेह नग्नावस्थेत एका पोत्यात भरलेला सापडला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. जाटवानमध्ये ही घटना घडली आहे. यादव आणि त्याचे सहकारी तरुणीला घरातून उचलून घेऊन गेले होते. तिला नशेचा पदार्थ देऊन तिची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता आरोपी या तरुणीला घरातून घेऊन गेले होते. मृत तरुणीचे शव मैनपुरी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आले आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्यावर अत्याचार झाला की नाही ते समजणार आहे.