Khalistanis also involved in farmers' agitation, claims Congress MP Ravneet Singh Bittu | शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा

शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही केली घुसखोरी ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेतहे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही घुसखोरी केली असल्याचा दावा काँग्रेसचे लुधियानामधील खासदार रवनीत बिट्टू यांनी केला आहे. ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेत, असा दावा बिट्टू यांनी केला आहे.

रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जात आहे. हे कसलं पंजाब आहे. पंजाबमधील लोक असे करू शकत नाहीत. पंजाबमधील शेतकरी असं करू शकत नाही. ठोक देंगेसारखी भाषा पंजाबची नाही आहे. अशी भाषा बोलणारे असामाजिक आहेत. पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू अशी भाषा शेतकरी करू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. 


लुधियानामधील खासदार असलेल्या रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितले की, शेतकरी शांततेने आंदोलनाला बसले आहेत. तीन महिने पंजाबमध्ये आंदोलन सुरू असताना काही झाले नाही. पंजाब सरकारने हे आंदोलन शांततेने व्हावे, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच ते पन्नास हजार जण आहेत. हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आता नेत्यांनी पुढे येऊन यावर नियंत्रण नियंत्रण मिळवले पाहिजे कारण अनेक जण हे आंदोलन अपयशी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात. शेतकऱ्यांनाही तसेच वाटते. शेतकऱ्यांना ना कृषिमंत्र्यांवर विश्वास आहे. ना अन्य कुणावर, असेही बिट्टू यांनी सांगितले.

रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे युवा नेते आहे. ते लुधियाना येथील खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसबा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. बेअंत सिंह यांची मुख्यमंत्री असताना हत्या करण्यात आली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Khalistanis also involved in farmers' agitation, claims Congress MP Ravneet Singh Bittu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.