चपलेत कॅमेरा लावून तो काढायचा अश्लील फोटो,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 19:03 IST2018-01-11T18:41:33+5:302018-01-11T19:03:10+5:30

बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चप्पल कॅमे-याचा वापर करत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा.

Kerala: Pervert makes 'chappal camera' to take upskirt photos of unsuspecting women | चपलेत कॅमेरा लावून तो काढायचा अश्लील फोटो,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चपलेत कॅमेरा लावून तो काढायचा अश्लील फोटो,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तिरूवनंतपुरम : तरूणी आणि महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या चपलेमध्ये मोबाइल फोन लपवला होता. अनेकदा या व्यक्तीने हा घृणास्पद प्रकार केला आहे. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.   

'द न्‍यूज मिनट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने चप्पल कॅमे-याचा वापर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात 'स्‍कूल आर्ट फेस्‍टीव्हल'दरम्यान तरूणी आणि महिलांचे स्कर्ट खालील फोटो घेण्यासाठी केला होता. 
शक्कल लढवून हा व्यक्ती चप्पलेच्या सोलमध्ये जागा करून मोबाइल लपवायचा. कॅमेरा वरच्या बाजूला राहील याची तो काळजी घ्यायचा. वजनामुळे अथवा अन्य कोणत्या कारणामुळे फोन खराब होवू नये यासाठी तो स्टीलच्या एका खास कव्हरमध्ये फोन ठेवायचा. इतकंच नाही तर बॅटरी संपल्यास दुस-या फोनची व्यवस्थाही तो ठेवत होता. 
पोलिसांची चाणाक्ष नजर - 
अशाप्रकारे हा विकृत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा. पण पोलिसांची नजर त्याच्यावर पडली , त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला.   

(फोटो सौजन्य: द न्‍यूज मिनट)

Web Title: Kerala: Pervert makes 'chappal camera' to take upskirt photos of unsuspecting women