शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:54 AM

भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला.

तिरुअनंतपुरम : यापूर्वीच्या निवडणुकांत कर्नाटक वगळता दक्षिण भारतात भाजप अस्तित्वहीन पक्ष होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून भाजपने पद्धतशीरपणे दक्षिणी राज्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूप्रमाणेच केरळ या राज्याचाही त्यात समावेश आहे. सध्या भाजपने या राज्यात सहा मतदारसंघांकडे लक्ष केंद्रित केले असले तरी पक्षाचा मुख्य उद्देश राज्यात चंचूप्रवेश करण्याचाच आहे. मात्र, इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष काँग्रेस आणि सीपीआय या राज्यातील सर्व २० लोकसभा मतदारसंघांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यात राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.

राहुल हे मोठे नेते आहेत त्यांनी मित्र पक्षाविरुद्ध निवडणूक लढविण्याऐवजी देशात इतरत्र थेट भाजपाशी दोन हात करावे, असे आवाहन सीपीआयने केले होते. भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला. त्याचे मतांत किती रूपांतर होते, हे पाहावे लागेल. केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व मतदारसंघांत मतदान होणार आहे.

या जागांवर भाजपचे लक्ष्य पलक्कड, कासारगोड, थ्रिसूर, पथनमथीहत्ता व थिरुअनंतपुरम. दोन नगरपालिका आणि २० पंचायतींवर सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपने केरळमध्ये २०१६ साली थिरुअनंतपुरम विधानसभेची जागा जिंकली होती; पण २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ती टिकवता आली नाही.

या मतदारसंघांवर फाेकसभाजपने सहा असे मतदारसंघ निश्चित केले आहेत, जिथे भाजपने मागच्या निवडणुकीत किमान २५ टक्के मते मिळवली होती. थिरुअनंतपुरम आणि थ्रिसूरसह हे मतदारसंघ भाजपने ए कॅटेगरीत टाकलेले आहेत. थिरुअनंतपुरममध्ये काँग्रेसच्या शशी थरूर यांच्या विरोधात भाजपने आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना रिंगणात उतरवले आहे. सीपीआयतर्फे पन्नीयन रवींद्रन लढत आहेत. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने ३० टक्के एवढी लक्षणीय मते मिळवली होती.

या ठिकाणी आलटून पालटून संधीथ्रिसूर मतदारसंघही भाजपने प्रतिष्ठेचा बनवला असून, येथून सिने अभिनेते सुरेश गोपी भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. सीपीआयचे व्ही. एस. सुनील कुमार आणि काँग्रेसचे के. मुरलीधरन हेही शर्यतीत आहेत. गेल्या ७२ वर्षांत या मतदारसंघात सीपीआय आणि काँग्रेसचे उमेदवार आलटून पालटून निवडून आले आहेत. यंदा मात्र भाजपला वाटतेय की, या मतदारसंघात आपल्याला संधी आहे.

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४