शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:19 IST

Kerala Local body Election: राजकारण आणि सत्ताकारणामध्ये नवनवी आणि अजब समीकरणं जुळणं ही आता नित्याची बाब झालेली आहे. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशा आघाड्या दिसून आल्या होत्या. आता केरळमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का देणारी आघाडी समोर आली आहे.

राजकारण आणि सत्ताकारणामध्ये नवनवी आणि अजब समीकरणं जुळणं ही आता नित्याची बाब झालेली आहे. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशा आघाड्या दिसून आल्या होत्या. आता केरळमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का देणारी आघाडी समोर आली आहे. केरळमध्ये काही ठिकाणी काँग्रेस, सीपीआयएम  आणि भाजपा या एकमेकांच्या कट्टर विरोधक असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत एकमेकांचे विरोधी पक्ष असलेले हे पक्ष एकत्र कसे काय आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, काँग्रेस, भाजपा आणि डावे हे विरोधी पक्ष एकत्र येण्यामागचं नेमकं कारणही आता समोर आलं आहे. कोचीजवळ असलेल्या किकेक्स ग्रुपची राजकीय संघटना असलेल्या ट्वेंटी-२०चा प्रभाव सध्या राज्यातील अनेक भागात वाढत चालला आहे. त्यामुळे या ट्वेंटी-२० संघटनेचा प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेस भाजपा आणि सीपीआयएम हे पक्ष एकत्र आले आहेत. ९ आणि ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक पालिका निवडणुकीत ट्वेंटी-२० पक्षाला आव्हान देण्यासाठी या पक्षांनी किजक्कम्बलम येथे संयुक्तरीत्या अपक्ष उमेदवार उतरवले आहेत.

किजक्कम्बलम गावाचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून किटेक्स ग्रुपने २०१३ साली ट्वेंटी-२० पक्षाची स्थापना सीएसआर कार्यक्रम म्हणून केली होती. या कंपनीने २०१५ साली पहिल्यांदा पंचायतीची निवडणूक लढवून जिंकली होती. तर २०२० मध्ये या कंपनीने आणखी तीन पंचायती आपल्या ताब्यात घेतल्या होत्या.

या दरम्यान, यावेळी ही ट्वेंटी-२० संघटना ४८ पंचायती, कोची महानगरपालिका, तीन नगर परिषदा आणि अनेक जिल्ह्यांमध्ये   निवडणूक लढवत आहे. काही पंचायतींमध्ये सर्व जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. त्यात पुथ्रिका पंचायतीमध्ये या संघटनेने सर्व जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. ट्वेंटी-२० ग्रुपच्या या प्लॅनिंगमुळे माकपासह भाजपा आणि काँग्रेस या पक्षांमध्ये घबराट पसरली आहे. ट्वेंटी-२० पक्षाचे अध्यक्ष आणि किटेक्सचे एमडी साबू एम. जेकब यांनी सांगितले की,  ‘’आमच्या पक्षाने चार पंचायतींमधील भ्रष्टाचार संपुष्टात आणला आहे. तसेच सुमारे ५० कोटी रुपयांची बचत केली आहे’’. दरम्यान, किजक्कम्बलम येथे ५० टक्के सब्सिडीसह वस्तू देणाऱ्या फूड सेफ्टी मार्केटने पक्षाला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारींनंतर हा बाजार बंद करण्यात आला होता.

ट्वेंटी-२० पक्षाचं निवडणूक चिन्ह आंबा हे आहे. मात्र या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार त्यांच्याविरोधात वेगवेगळी चिन्हे घेऊन उतरले आहेत. त्यामुळे ही लढत आणखीनच रंगतदार झाली आहे. एकूणच किटेक्स समुहाच्या ट्वेंटी-२० या राजकीय संघटमेने केरळमधील राजकारणाला नवं वळण दिलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rivals Unite: Congress, BJP, Left Form Alliance in Kerala Election

Web Summary : In a surprising Kerala twist, Congress, BJP, and Left parties, traditional rivals, have joined forces. They aim to counter the growing influence of the Twenty-20 political group backed by the Kitek Group in local elections. This unusual alliance highlights the changing political landscape in the region.
टॅग्स :KeralaकेरळLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)