शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 22 जणांचा मृत्यू, पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:58 PM

केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्कीमध्ये भूस्खलन होऊन 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मलप्पुरममध्ये 5, कन्नूरमध्ये 2 आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, वायनाड, पलक्कड आणि कोझिकोड याठिकाणी काही लोक बेपत्ता झाल्याचे समजते. तर, इडुक्कीमधील अडीमाली शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. आर्मी, नेव्ही, कोर्ट गार्ड आणि एनडीआरएफकडून मदत मागितली आहे. तीन एनडीआरएफच्या तीन पथके बचावासाठी दाखल झाली आहेत. दोन पथके पोहचणार आहेत. तसेच, आणखी सहा पथकांना बोलविण्यात आले आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे.

दरम्यान, या पावसामुळे केरळमधील विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. राज्यातील शाळा, कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. याचबरोबर, मुसळधार पावसामुळे इडुक्की येथील धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे 26 वर्षांनंतर खुले करण्यात आले आहेत. गुरुवारी या धरणातून 600 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. 

 

 

 

टॅग्स :Rainपाऊसkeralकेरळ