शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

"काँग्रेसमधील बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 2:13 PM

पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली.

ठळक मुद्देकेरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी केरळ विधानसभा सत्रात अविश्वास  ठरावावर झालेल्या चर्चेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची अवस्था बिकट आहे आणि बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहत आहेत, असे पी. विजयन यांनी म्हटले.

काँग्रेस आपले नेतृत्व ठरविण्यास असमर्थ आहे, तर पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांना 'भाजपाचे एजंट' म्हणत आहेत. पक्षाचे बहुतेक नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपाच्या कॉलची वाट पाहात आहेत, असा दावा पी. विजयन यांनी केला आहे.

काँग्रेसमधील नेतृत्त्वावरून घडलेल्या संकटावर पी. विजयन यांनी निशाणा साधला. काँग्रेसच्या नेतृत्वात दोन गटांमध्ये फूट पडली असून, त्यावर सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत एक गट या मागणीवर ठाम होता तर दुसरा गट स्वतःच गांधी कुटुंबातील विश्वास टिकवून ठेवण्याच्या बाजूने होता.

यावरुन, केरळ विधानसभेत मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. "एकीकडे त्यांनी येथे अविश्वास प्रस्ताव दिला आहे, तर दुसरीकडे दिल्लीत अविश्वास प्रस्ताव चालला आहे. तेथे त्यांचे नेते एकमेकांना भाजपा एजंट म्हणत आहेत. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना आपण भाजपाचे एजंट नाही असे सर्वांसमोर सांगावे लागले. मात्र नंतर त्यांनी आपले म्हणणे मागे घेतले," असे पी. विजयन यांनी म्हटले.

याचबरोबर, पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली. ज्यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते की, केरळमध्ये लेफ्ट पार्टी सत्तेत पुन्हा कधीच येणार नाही. मात्र, त्यानंतर लेफ्ट पार्टी सत्तेत चारवेळी आली, असे पी. विजयन यांनी म्हटले.

"काँग्रेसमध्ये नेता निवडण्याची क्षमता नाही. वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्व बदलण्याची मागणी केली. सोनिया गांधी राजीनामा देण्यास सहमत होत्या. राहुल गांधी यांनी यापूर्वीच पदावर येण्यास नकार दिला आहे. या लोकांनी राजकीय पक्ष म्हणून कधी भूमिका घेतली आहे का?", असा सवाल पी. विजयन यांनी केला.

दरम्यान, केरळ विधानसभेत एलडीएफ सरकारविरोधात काँग्रेसप्रणित यूडीएफने अविश्वासदर्शक ठराव आणला. मात्र, एलडीएफच्या बहुमतामुळे अविश्वासदर्शक ठरावाने टिकाव धरला नाही. केरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!! 

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळBJPभाजपा