राजकारणापासून जयाला दूर ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2016 01:55 AM2016-05-06T01:55:36+5:302016-05-06T01:55:36+5:30

जया बच्चन यांचा अस्थिर स्वभाव आणि सवयी पाहता त्यांना आपल्या राजकीय पक्षात प्रवेश देऊ नका आणि राजकारणापासून दूरच ठेवा. भारतीय राजकारणात त्यांना संधी देणे धोक्याचे

Keep away from politics! | राजकारणापासून जयाला दूर ठेवा!

राजकारणापासून जयाला दूर ठेवा!

Next

नवी दिल्ली : जया बच्चन यांचा अस्थिर स्वभाव आणि सवयी पाहता त्यांना आपल्या राजकीय पक्षात प्रवेश देऊ नका आणि राजकारणापासून दूरच ठेवा. भारतीय राजकारणात त्यांना संधी देणे धोक्याचे ठरू शकते, असा इशारा अमिताभ बच्चन यांनी आपल्याला दिलेला होता, परंतु त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून जया बच्चन यांना समाजवादी पार्टीत प्रवेश मिळवून दिला, असा खुलासा अमिताभ यांचे एके काळचे चांगले मित्र अमरसिंग यांनी केला आहे.
कर चुकवण्याच्या उद्देशाने विदेशात आपली बेहिशेबी संपत्ती जमविल्याच्या संदर्भात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘पनामा पेपर्स’मध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांचे नाव आले होते. या संदर्भात विचारले असता, अमरसिंग यांनी हा गौप्यस्फोट केला. अमिताभ बच्चन यांनी पनामा पेपर्स लीकमध्ये आपला सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले होते. या पनामा पेपर्स लीकबद्दल आणि त्यात बच्चन कुटुंबीयांचे नाव आल्याबद्दल विचारले असता, अमरसिंग म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वीच मी बरेली येथे जाहीर प्रतिज्ञा केली आहे.’
‘ऐश्वर्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर तिने माझा नेहमीच आदर केलेला आहे आणि अभिषेक बच्चन याने माझ्याविरुद्ध कधी एक शब्दही काढलेला नाही. अमिताभ यांच्याशी माझा कसलाही वाद नाही, परंतु त्यांनी मला जया बच्चन यांचा अस्थिर स्वभाव व सवयी पाहता, त्यांना समाजवादी पार्टीत प्रवेश न देण्याचा इशारा दिलेला होता, परंतु मी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले.’ (वृत्तसंस्था)

शांतपणे जगू द्या
अमरसिंग म्हणाले, ‘बच्चन कुटुंबाविषयी मला काही
बोलायचे नाही. काही प्रश्न असतील तर ते त्यांनाच विचारा. पनामा पेपर्सबाबत विचारायचे असेल तर अरुण जेटलींना विचारा. मला बच्चन आणि त्यांच्या नावाशिवाय शांतपणे जगू द्या.’

Web Title: Keep away from politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.