३० मिनिटांत कबाब पोहोचले घरी, झोमॅटोला महागात पडू शकते 'फास्ट डिलिव्हरी'... वाचा, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:56 AM2024-02-12T10:56:58+5:302024-02-12T10:57:50+5:30

झोमॅटो विरोधात एका ग्राहकाने गुन्हा दाखल केला आहे.

Kebab from Lucknow reaches Gurugram in 30 minutes, customer files case against Zomato | ३० मिनिटांत कबाब पोहोचले घरी, झोमॅटोला महागात पडू शकते 'फास्ट डिलिव्हरी'... वाचा, नेमकं काय घडलं

३० मिनिटांत कबाब पोहोचले घरी, झोमॅटोला महागात पडू शकते 'फास्ट डिलिव्हरी'... वाचा, नेमकं काय घडलं

झोमॅटो हे एक ऑनलाईन फुड डिलिव्हर करणारे प्लॅटफॉम आहे, यावरुन आपल्याला खाद्य पदार्थ मागवता येतं. खाद्य पदार्थ ऑर्डर केल्यानंतर झोमॅटो आपल्याला ३० मिनिटांत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खाद्य पदार्थ लवकर पोहोचवण्याबाबत आता झोमॅटो विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण गुरुग्राम येथील आहे. येथील सौरव मॉल याने झोमॅटोवर जेवण ऑर्डर केले. सौरवने 'Zomato Legends' नावाच्या सब सर्व्हिसमधून चार डिश ऑर्डर केल्या होत्या. यामध्ये तीन डिश दिल्लीचे, तर एक लखनऊची होती. त्यांनी लखनौहून ‘गलोटी कबाब’ मागवले होते. तर जामा मशिदीतून 'चिकन कबाब रोल', कैलास कॉलनीतून 'ट्रिपल चॉकलेट चीज केक', जंगपुराहून 'व्हेज सँडविच'ची ऑर्डर केली होती. ही ऑर्डर ३० मिनिटांत त्यांना पोहोचली. खरेतर लखनौहून गुरुग्रामला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो पण येथून कबाब फक्त ३० मिनिटांत पोहोचले. या प्रकरणी आता सौरव मॉलने झोमॅटोविरोधात गुन्हा दाखल केला.

चक्क IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक, IRS सांगून लग्न केलेला निघाला ठग

'Zomato Legends' ने कोलकाता, हैदराबाद, लखनौ, जयपूर, बेंगळुरू, मथुरा, चेन्नई आणि आग्रा यासह विविध शहरांतील नामांकित रेस्टॉरंट्समधून गरमागरम पदार्थ वितरित करण्याचा दावा केला आहे. पण लखनौ आणि गुडगावमधील अंतर सुमारे ५०० किलोमीटर आहे, हे लक्षात घेता कबाब जवळच्या रेस्टॉरंटमधून घेतल्यासारखे पटकन आले. या प्रकरणी वकील तिशंपती सेन, अनुराग आनंद आणि बियांका भाटिया यांनी झोमॅटोविरोधात गुन्हा दाखल केला. झोमॅटोला ते इतक्या लवकर कसे पोहोचवले हे सिद्ध करावे लागणार आहे.

झोमॅटोला समन्स पाठवले

सौरव यांच्या याचिकेवर, साकेतच्या स्थानिक न्यायालयाने निरिक्षण केल्यानंतर, झोमॅटोला समन्स पाठवले. सौरव मॉल यांच्या कायदेशीर टीमने असा युक्तिवाद केला की, लखनौमधून इतक्या कमी वेळेत खाद्य पदार्थाची वाहतूक करणे शक्य नाही आणि त्याऐवजी ते पदार्थ विविध झोमॅटो गोदामांमध्ये ठेवले असावे. हे अन्न रेस्टॉरंट पॅकेजिंगऐवजी झोमॅटो पॅकेजिंगमध्ये आले होते, ज्यामुळे खाद्यपदार्थांच्या ऑर्डरबद्दल संशय आणखी वाढला. सध्याच्या दाव्यांतर्गत झोमॅटोला 'झोमॅटो लीजेंड्स' सेवा बंद करण्याची विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे. कारण अशा ऑर्डरवरील खाद्यपदार्थ ताजे नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे, असं या याचिकेत म्हटले आहे. 

Web Title: Kebab from Lucknow reaches Gurugram in 30 minutes, customer files case against Zomato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.