शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

हरियाणात कथुआची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर हत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 8:48 AM

जम्मूतल्या कथुआ प्रकरणामुळे देशभरात संताप असतानाच आता हरियाणातल्या यमुनानगरमध्ये अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हरियाणात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

चंदीगड- जम्मूतल्या कथुआ प्रकरणामुळे देशभरात संताप असतानाच आता हरियाणातल्या यमुनानगरमध्ये अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हरियाणात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर मुलीचं डोकं भिंतीवर आपटून तिला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार लोकांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचं मेडिकल करण्यात आलं असून पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती स्टेशन पोलीस अधिका-यांनी दिली आहे.पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना यमुनानगरमधल्या जठलाना भागातील आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडितेचे आई-वडील घरी नव्हते. घरात पीडिता आणि तिचे भाऊ-बहीण होते. परंतु ते सर्व झोपेत होते. त्याच वेळी काही अज्ञातांनी घरात प्रवेश केला आणि अपहरण करून पीडित मुलीला एका मंदिर परिसराजवळ घेऊन गेले. पीडितेच्या जबाबानुसार, मंदिर परिसरात दोन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर इतर दोन आरोपी बलात्कार होताना पाहत होते. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित मुलीचं डोकं जोरजोरात भिंतीवर आपटलं. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्याच वेळी आरोपी फरार झाले. पीडिता जेव्हा शुद्धीत आली त्यावेळी तिनं लागलीच घर गाठलं आणि सर्व घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी या प्रकाराची पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पीडितेचं मेडिकल केल्यानंतर चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आमची मुलगी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाही. तिला न्याय मिळवून देण्याची गरज आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कार