शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरप्रशी काँग्रेस बोलतेय पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 17:44 IST

काश्मीरप्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती आरोप केला आहे. काश्मीरप्रश्नी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांचे बोल काश्मीरसाठी स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांसारखे आहेत.

बंगळुरू - काश्मीरप्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती आरोप केला आहे. काश्मीरप्रश्नी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांचे बोल काश्मीरसाठी स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांसारखे आहेत. हा आमच्या देशातील जवानांचा अपमान आहे. असा टोला काँग्रेसला लगावला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी काश्मीर प्रश्नावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला ठिणगी पडली आहे. त्याचा धागा पकडत मोदींनी चिदंबरम यांचे नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. "काँग्रेस्च्या एका ज्येष्ठ नेत्यांनी काल केलेले वक्तव्य त्यांचा पक्ष सैनिकांचे शौर्य आणि सर्जिकल स्ट्राइकबाबत काय विचार करतो हे दाखवणारे आहे. काश्मीरच्या भूमीवर फुटीरतावादी आणि पाकिस्तानमध्ये जी भाषा बोलली जाते, तीच भाषा काँग्रेसचे नेते करत आहेत.  जे कालपर्यंत सत्तेत बसले होते. ते अचानक यू टर्न घेत आहेत. त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा खेद वाटत नाहीये."असे मोदी म्हणाले. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी वित्तमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी केली होती. शनिवारी गुजरातमधील राजकोटमध्ये एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केले होतं. जम्मू-काश्मीरच्या लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असं जाणवलं की, जेव्हा ते स्वातंत्र्याची मागणी करतात तेव्हा खरं तर तेथील लोकांना स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता हवी आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसने हात झटकले आहेत. एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक मत म्हणजे पक्षाची भूमिका होत नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला आणखी स्वायत्तता देण्याची मागणी केली होती. त्याचा भाजपानं निषेध नोंदवला आहे. जम्मू-काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते कायम राहील. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत हे काँग्रेसचंही मत असल्याचं मानणं योग्य ठरणार नाही, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा