शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 3:09 PM

लॉकडाऊन दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एकाच्या जीवावर बेतलं आहे.

नवी दिल्ली - शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण नानाविध शक्कल लढवत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. मृत्युचा अनुभव घेण्याच्या प्रयत्नात तरुणाने जीव गमावल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय असं म्हणत एक व्यक्तीने विष प्यायल्याची घटना घडली आहे. तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न टिकटॉक व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. धनंजय असं या तरुणाचं नाव असून त्याला मृत्यूचा अनुभव घ्यायचा होता. कमावत नसल्याने धनंजयच्या आईने त्यावरून त्याला काही गोष्टी ऐकवल्या होत्या. त्यानंतर धनंजयने कीटकनाशकाची एक बाटली आणली. त्यातील विष घेत टिकटॉकवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. आपल्याला मृत्युचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यामुळे स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतोय असं धनंजयने म्हटलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर धनंजयला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. धनंजयने मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी या आधीही असाच एक जीवघेणा प्रकार केला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मोटारसायकलने एका झाडाला धडक दिली होती. मात्र या अपघात तो गंभीर जखमी झाला आणि वाचला. त्यावेळी त्याच्या काही नातेवाईकांनी त्याला समजावलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी टिकटॉक व्हिडिओ तयार करत असताना चुकून गळफास लागल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. राजस्थानच्या दौसा शहरात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली असता मुलाला टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचा नाद असल्याची माहिती मिळाली. तसेच तो दररोज वेगवगळे स्टंट करून त्याचे व्हिडीओ तयार करत असे. मुलाचा ज्या रात्री मृत्यू झाला त्या दिवशी तो आपल्या घरातच फाशीचा व्हिडिओ तयार करत होता. व्हिडिओसाठी त्याने घरातील पंख्याला एक कपडा बांधून फाशीचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि व्हिडिओ बनवतानाच तो फास त्याच्या गळ्याभोवती अडकला गेला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?

CoronaVirus News : धोका वाढला! एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये व्हायरसचा पुन्हा शिरकाव

इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTik Tok Appटिक-टॉकDeathमृत्यूPoliceपोलिस