इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:40 AM2020-06-10T09:40:50+5:302020-06-10T10:39:12+5:30

नव्या टूथब्रशमध्ये ड्यूल प्रो ब्रश मोड देण्यात आले आहेत. हे इक्विक्लीन ऑटो टायमरसोबत येतो. हे युजरचे दात स्वच्छ करण्यास मदत करते.

Xiaomi's Mi Electric Toothbrush launched in India: Price, battery life, and more | इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार

इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार

Next

नवी दिल्ली - Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच आता शाओमीने आपला आणखी एक इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच केला आहे. चीनी कंपनीने जवळपास तीन महिन्यांपूर्वी Mi Electric Toothbrush T300 टूथब्रश भारतात लाँच केला होता. आता लेटेस्ट Mi Electric Toothbrush T100 लाँच केला आहे. हा टूथब्रश आधीच्या तुलनेत जास्त पॉकेट फ्रेंडली आहे.

Mi Electric Toothbrush T100 मध्ये अल्ट्रा सॉफ्ट ब्रिस्टल, लो-नॉईज डिझाईन आणि 30 दिवसांची बॅटरी लाईफ मिळते. इलेक्ट्रिक टूथब्रश टी100 ची डिझाईन स्लीक आणि सिंगल कलरमध्ये आहे. तसेच शाओमीने हे टूथब्रश डॉक्टरांच्या सल्ल्याने तयार केल्याचा दावा केला आहे. क्राउडफंडिंग अंतर्गत मी डॉट कॉमवर उपलब्ध असून याची किंमत 549 रुपये आहे. 15 जुलैपासून या टूथब्रशची विक्री सुरू होणार आहे. शाओमीने ब्रश हेड्सच्या उपलब्धतेबद्दल काहीही माहिती दिली नाही. या टूथब्रशची टक्कर ओरल बी आणि कोलगेटच्या इलेक्ट्रिक टूथब्रशसोबत होणार आहे. 

ओरल-बी क्रॉसऐक्शन बॅटरी टूथब्रशची किंमत 359 रुपये आहे. तर कोलगेट 360 चारकोल बॅटरी टूथब्रशची किंमत 599 रुपये आहे. शाओमीच्या या नव्या टूथब्रशमध्ये ड्यूल प्रो ब्रश मोड देण्यात आले आहेत. हे इक्विक्लीन ऑटो टायमरसोबत येतो. हे युजरचे दात स्वच्छ करण्यास मदत करते. हे युजरला 30 सेकंदानंतर एकाचवेळी किती वेळ खर्च करायचा याची माहिती देते. या टूथब्रशमध्ये दोन मोड स्टँडर्ड आणि जेंटल देण्यात आले आहे. या ब्रशची डिझाईन अल्ट्रा सॉफ्ट आहे.

चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक

शाओमीने इलेक्ट्रिक टूथब्रश टी 100 मध्ये 30 दिवसांची बॅटरी लाईफ असल्याचा दावा केला आहे. तसेच हा टूथब्रश फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यामध्ये बॅटरी स्टेट्स सांगण्यासाठी एक LED इंडिकेटर आहे. इलेक्ट्रिक टूथब्रश IPX7 रेटिंग सोबत येतो. पाण्यात असूनही तो खराब होत नाही. या टूथब्रशचे वजन 46 ग्रॅम आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी शाओमीने दमदार सोलर पॉवर बँक आणली आहे. Youpin प्लॅटफॉर्मवर कंपनीने नवीन सोलर पॉवर बँक लाँच केले आहे. या YEUX पॉवर बँकला आऊटडोर ट्रॅव्हलसाठी डिझाईन करण्यात आले आहे. सोलर पॉवर बँकला बॅगपॅक अटॅच केले जाऊ शकते. तसेच सायकलिंग, हायकिंग किंवा कॅम्पिंग करताना याची खूप मोठी मदत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

केस कापले, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला अन्...; भयंकर घटनेमागचं धक्कादायक कारण

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

Web Title: Xiaomi's Mi Electric Toothbrush launched in India: Price, battery life, and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.