भयानक घटना! १० वर्षांच्या मुलावर ३० हून अधिक कुत्र्यांचा हल्ला, उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:44 IST2025-08-20T13:42:50+5:302025-08-20T13:44:11+5:30

कर्नाटकातील चिकबल्लापूरमध्ये एका १० वर्षांच्या मुलावर ३० हून अधिक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली.

Karnataka: Stray dogs attack 10-year-old boy in Chikkaballapur | भयानक घटना! १० वर्षांच्या मुलावर ३० हून अधिक कुत्र्यांचा हल्ला, उपचार सुरू

भयानक घटना! १० वर्षांच्या मुलावर ३० हून अधिक कुत्र्यांचा हल्ला, उपचार सुरू

कर्नाटकातील चिकबल्लापूरमध्ये एका १० वर्षांच्या मुलावर ३० हून अधिक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सिद्धघट्टा येथील नेताजी स्टेडियममध्ये घडली. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संताप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चरण नावाच्या एका १० वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही खेळाडूंनी चरणला कुत्र्यांपासून वाचवले आणि ताबडतोब त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत चरण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भटके कुत्रे परिसरात एक मोठे आव्हान बनले आहेत आणि यासाठी नागरी संस्था जबाबदार आहे.

दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर श्वानप्रेमींकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे प्राण्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, हा निर्णय मागे घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. श्वानप्रेमींचे म्हणणे आहे की, सध्याच्या आश्रयगृहांमध्ये कुत्र्यांची योग्य काळजी घेतली जाईल की नाही, याची खात्री नाही. सरकारने पुरेसे आणि चांगल्या सुविधांसह आश्रयगृहे बांधल्याशिवाय हा निर्णय लागू करू नये. अनेक आश्रयगृहांची अवस्था दयनीय आहे आणि तेथे कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यामुळे, आधी या सुविधा सुधारणे आवश्यक आहे.

Web Title: Karnataka: Stray dogs attack 10-year-old boy in Chikkaballapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.