कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:37 IST2025-11-21T17:36:13+5:302025-11-21T17:37:23+5:30
Karnataka politics : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये कोणताही तणाव किंवा गटबाजी नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
कर्नाटककाँग्रेसमधील संभाव्य अंतर्गत कलहाच्या आणि सत्ता परिवर्तनाच्या चर्चांना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून 'नोव्हेंबर क्रांती' आणि काही आमदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक सविस्तर स्पष्टीकरण जारी केले आहे.
कर्नाटकच्याकाँग्रेस सरकारमध्ये कोणताही तणाव किंवा गटबाजी नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.
"सर्व १४० आमदार माझेच आमदार आहेत. कोणताही गट तयार करणे हे माझ्या रक्तात नाही. मुख्यमंत्री आणि मी नेहमीच सांगितले आहे की आम्ही हायकमांडच्या निर्णयासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री बनणे हा प्रत्येक आमदाराचा हक्क आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी आमदारांचे नेतृत्वाशी भेटणे ही एक सामान्य राजकीय प्रक्रिया आहे आणि यात कोणताही राजकीय दबाव नाही.", असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
तसेच शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यासोबत काम करू, असे स्पष्ट केले. या स्पष्टीकरणामुळे, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या अटकळांवर पडदा पडला आहे.