शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काँग्रेस, दिल्लीत भाजप; आता चालणार कोणते गणित? यश टिकवण्याचं भाजपासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 08:00 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीतील यश टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान

चंद्रकांत कित्तुरेबंगळुरू : भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांसाठी २६ एप्रिल आणि ७ मे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १४ जागांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आजपर्यंत सर्वाधिक २५ जागा जिंकणाऱ्या भाजपपुढे या निवडणुकीतही त्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे, तर पाच हमी योजनांच्या जोरावर राज्यात सत्तेत आलेली काँग्रेस लोकसभेसाठी विधानसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्याची आशा बाळगून आहे. 

जुन्या म्हैसूर आणि किनारपट्टीवरील दक्षिण कर्नाटकातील लोकसभेच्या १४ जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. या १४ जागांपैकी २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. या भागात लिंगायत समाजातील वोक्कलिगा मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावेळी जनता दल भाजप आघाडीत आहे. भाजपला या निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार काँग्रेसच्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

मतदानावर पडेल यांचा प्रभावराज्यात गेल्या चाळीस वर्षांतील भीषण दुष्काळ यंदा पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी केंद्राने पुरेशी मदत दिली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. राज्याकडून जाणारा महसूल आणि केंद्राकडून राज्याला मिळणारा त्यातील वाटा यातही अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत आहेत. राज्यातील बेरोजगारीचा मुद्दाही प्रभावी ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे नेतृत्व न दिल्याने ते नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठी त्याचे पुत्र बी. वाय. विजेंद्र यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र, यावरून भाजपवरही घराणेशाहीचा आरोप होत आहे. भाजप मोदी सरकारच्या योजना आणि विकासकामांतील यश यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे.  काँग्रेस विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राबविलेल्या पाच हमी योजना आणि स्थानिक मुद्द्यांवर भर देत आहे.

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस