शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल; सीमाभागातील पंप चालकांची विक्री ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 12:57 PM

इंधन विक्री ४ लाखांवरून ३० हजार लिटरपर्यंत आली खाली.

गुणवंत जाधवर  

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे. प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची दरात तफावत आहे. उमरग्यासह परिसरातील वाहनधारक इंधनासाठी कर्नाटकचा रस्ता धरीत आहेत. त्यामुळे पूर्वी उमरग्यासह परिसरात प्रतिदिन ४ लाख लिटर विक्री होणारे डिझेल आता  ३० हजार लिटरपर्यंत खाली आले आहे, हे विशेष. परिणामी राज्यातील सीमावर्ती भागातील अनेक पेट्राेलपंपांना टाळे लावण्याची नामुष्की ओढावली आहे.  उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचा सीमावर्ती भागात आहे. या सीमावर्ती भागातील वाहने आणि शेतकरी कर्नाटकात जाऊन बसवकल्याण, आळंद तालुक्यातील पंपावर इंधन भरत आहेत. तसेच मुंबई-हैदराबाद महामार्गावरील व गुलबर्गा-लातूर मार्गावरील वाहने कर्नाटक राज्यातील सीमेवरील पंपावर वाहनाची टाकी फुल्ल करतात. कारण कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे. पेट्राेल ९ रुपयांनी, तर डिझेल ८ रुपयांनी स्वस्त आहे. या इंधन स्वस्ताईचा फटका आता सीमावर्ती भागातील राज्यातील पेट्राेल पंपचालकांना बसू लागला आहे. इंधन विक्री जवळपास ठप्प झाली आहे. पूर्वी सर्व पेट्राेल पंपांवरून मिळून साधारपणे ४ लाख लिटर इंधन विक्री हाेत असे. आता हे प्रमाण अवघ्या ३० हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. 

तस्करीतून पैसे मिळवण्याचा धंदा फोफावला कर्नाटकातून स्वस्त पेट्रोल-डिझेल आणायचे आणि महाराष्ट्रात विकायचे, असा नवाच धंदा यानिमित्ताने सीमावर्ती भागात फोफावला आहे. लिटरमागे आठ-नऊ रुपये मिळाले, तरी दिवसभराचा खर्च निघेल इतकी विक्री होते. सध्या असे प्रकार जोमात सुरू आहेत.

कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने तेथून तस्करी करून महाराष्ट्रात आणले जात आहे. तेथील स्वस्ताईमुळे महाराष्ट्रातील सीमेवरील पंप बंद पडले आहेत. दररोजचा उमरगा  तालुक्यातील ४ लाख लिटरचा खप अवघ्या ३० हजार लिटरवर आला आहे. यावर तोडगा काढण्याची विनंती संघटनेने राज्य सरकारला वेळोवेळी केली आहे.  - रझाक अत्तार, अध्यक्ष, उमरगा तालुका पेट्रोल पंप संघटना

अशी आहे कर्नाटकातील स्वस्ताई उमरगामध्ये    बसवकल्याणमध्ये पेट्रोल                   पेट्रोल१२०.९२                १११.८८  डिझेल                 डिझेल   १०३.६१               ९५.५२ महाराष्ट्रापेक्षा ₹८.०९ स्वस्त (डिझेल)महाराष्ट्रापेक्षा ₹९.०४ स्वस्त (पेट्रोल)

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक