शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे भवितव्य अनिश्चित, पक्षातूनच गेले प्रतिकूल अहवाल; पोटनिवडणुकीनंतर निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 07:01 IST

कर्नाटकमध्येही विधानसभेच्या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. येदियुरप्पा हे आताच ७७ वर्षांचे होऊन गेले आहेत.

हरीश गुप्तानवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकगुजरात राज्याचे मुख्यमंत्री अनुक्रमे बी.एस. येदियुरप्पा आणि विजय रूपानी यांच्याभोवती वादळ घोंघावताना दिसत आहेत. त्याची कारणे मात्र भिन्न आहेत. पक्षश्रेष्ठींकडे या दोघांबद्दल पक्षातूनच अनेक प्रतिकूल अहवाल गेलेले असल्यामुळे त्यांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. बी.एस. येदियुरप्पा हे पक्षातील लोकांनी केलेल्या अनेक प्रकारच्या आरोपांना तोंड देत आहेत, तर विजय रूपानी यांच्यावर ते कामकाज चालवण्यात अकार्यक्षम असल्याची टीका होत आहे. कर्नाटकगुजरातमध्ये तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे भवितव्य ठरेल. कर्नाटकमध्येही विधानसभेच्या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. येदियुरप्पा हे आताच ७७ वर्षांचे होऊन गेले आहेत. ७५ वर्षे झाल्यावर कोणीही सक्रिय पद धारण करू नये, या पक्षाच्या धोरणाचे ते पालन करणार असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री गोविंद एम. कारजोल यांच्या नावावर जवळपास एकमत झाले आहे. 

उद्योगमंत्री मनसुख भाई मांडविया यांचे नाव चर्चेतगुजरातमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या आठही जागा जिंकणे हे रुपानी यांच्यासमोरील आव्हान आहे आणि त्या जिंकल्यानंतरही ते पदावर राहतीलच याची खात्री नाही. २०२२ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक आहे व पक्षाच्या नेतृत्वाला त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य हाती राहीलच याची हमी नाही. मुख्यमंत्रीपदासाठी जहाज उद्योगमंत्री मनसुख भाई मांडविया यांचे नाव चर्चेत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटकGujaratगुजरातElectionनिवडणूक