शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'या' पाच कारणांमुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पराभव झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 13:19 IST

काँग्रेस पक्ष केवळ पंजाब, मिझोराम आणि पाँडिचेरी या राज्यांपुरता उरला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मंगळवारी काँग्रेस पक्षाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी सर्व राजकीय पंडितांचे अंदाज मोडीत काढत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या समीप पोहोचली आहे. या विजयामुळे आता देशातील 22 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. तर काँग्रेस पक्ष केवळ पंजाब, मिझोराम आणि पाँडिचेरी या राज्यांपुरता उरला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, काँग्रेसचे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही. काँग्रेसच्या पराभवासाठी काही प्रमुख घटक कारणीभूत ठरले. नक्की कोणते आहेत हे घटक, याचा घेतलेला आढावा.

अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर- कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे साहजिकच यावेळी पक्षाविरोधात अँटी-इन्कम्बन्सीची लाट होती. याच अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे भाजपाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठे यश मिळाले होते. त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मेघालयमध्येही भाजपला या लाटेचा फायदा मिळाला होता. कर्नाटकमध्येही हीच गोष्ट काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली. याशिवाय, कर्नाटकचा आजपर्यंतचा इतिहास पाहता कोणताही पक्ष सलग दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेत येऊ शकलेला नाही.

2013 मधील रणनीतीपासून फारकत- भाजपाने यावेळी 2013 पेक्षा वेगळी रणनीती अवलंबिली होती. प्रत्येक प्रचारसभेत भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली. भाजपा नेत्यांचा एकूणच पवित्रा आक्रमक होता. 2013 साली रेड्डी बंधू भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी भाजपात तीन गट पडले होते. परंतु, या निवडणुकीत हे तिन्ही गट एकत्र आले होते. त्यामुळे भाजपाला मोठा फायदा झाला.पैशांचा वापर- कर्नाटक निवडणुकीपूर्वी 21 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. याशिवाय, आगामी लोकसभेतही भाजपाच पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे अधिक आहेत. त्यामुळे उद्योपगतींसह अन्य देणगीदारांचा ओढा हा भाजपाकडे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसला आर्थिक कुमक कमी पडल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली.स्वयंसेवकांची फौज- काँग्रेसच्या तुलनेत भाजपाकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतशीरपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. याचा भाजपाला खूप मोठा फायदा निवडणुकीत झाला.राज्याची पिछेहाट- मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काळात कर्नाटकचा विकास काही प्रमाणात खुंटला. राज्याचा विकासदरही फारसा वाढला नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपशासित राज्यांतील अनेक लोकप्रिय योजनांची कॉपी केली होती. याशिवाय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची खेळीही सिद्धरामय्या यांनी केली होती. मात्र, यापैकी कोणताही मुद्दा काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवून देऊ शकला नाही. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेस