शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 1:39 PM

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचा मास्टरप्लान

बंगळुरू: कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देताच आज सकाळी भाजपाचे विधीमंडळातील नेते येडीयुरप्पा यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता आमदारांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाचे आमदार नाराज आहेत. याच आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र तो बहुमतापासून 8 जागा दूर आहे. त्यामुळे 78 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं थेट 37 जागा जिंकलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसनं एकत्र येत भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. जेडीएसच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करुन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र वोकलिंगा समाजाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देण्याचा मानस दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाच्या आमदारांना पटलेला नाही. काँग्रेसमध्ये लिंगायत समाजाचे 21 आमदार आहेत. तर जेडीएसमध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या आमदारांची संख्या 10 इतकी आहे. याच आमदारांना गळाला लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा लिंगायत समाजाचे राज्यातील मोठे नेते मानले जातात. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वावर नाराज असलेले काँग्रेस आणि जेडीएसमधील जवळभर डझनभर आमदार भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. भाजपाचे 104 आमदार असल्यानं त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 8 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस, जेडीएसच्या नाराज आमदारांचं समर्थन मिळवण्यात भाजपा यशस्वी झाल्यास त्यांना बहुमत सिद्ध करण्यात यश येऊ शकतं. असं घडल्यास भाजपासाठी ते मोठं यश असेल. मात्र काँग्रेस आणि जेडीएससाठी ती मोठी नामुष्की ठरेल. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाYeddyurappaयेडियुरप्पाcongressकाँग्रेस