शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:34 IST

कर्नाटकात काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातच पराभव झाला आहे.

बेंगळुरु- कर्नाटकचे मावळत्या विधानसभेतील मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी कर्नाटक हे एकमेव मोठे आणि महत्त्वाचे राज्य शिल्लक राहिले होते. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती. सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमधून पराभव होणे काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक आहे. काँग्रेसने ही संपूर्ण निवडणूक सिद्धरामय्या यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दिला पणाला लावून निवडणूक लढविली होती. 

मुख्यमंत्री पदावरती असूनही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सिद्धरामय्या कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 1985 व 1989 साली दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. होळेनरसिंहपूर आणि सतनूर या दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला होता. 1985 साली ते दोन्ही जागांवर विजयी झाले आणि 1989 साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले. मात्र दोन्ही वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते.

1999 ते 2004 असे स्थिर सरकार देणाऱ्या आणि चांगले प्रशासक म्हणवल्या जाणाऱ्या एस. एम. कृष्णा यांना 2004 साली मतदारसंघ बदलावा लागला होता. त्यांनी मद्दूरऐवजी चामराजपेटमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस जनता दल सेक्युलरचे नेते आणि त्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एच.डी. कुमारस्वामीही दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. रमणगारा आणि चन्नपटट्ण अशा दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरलेले होते. 

 देवराज अर्स यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहाण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली तरिही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र याला संधी दिली आणि ते शेजारील चामुंडेश्वरी विधानसभा मतादरसंघात गेले आहेत. या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून गेले आणि दोन वेळा पराभूत झाले आहेत. 2006 साली त्यांनी येथून शेवटची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना फक्त 257 मते मिळाली होती. तसेच त्यांचे एकेकाळचे मित्र जीटी देवेगौडा जे वक्कलिंग समाजाची मते मिळवण्यासाठी मदत करायचे तसेच श्रीनिवास प्रसाद दलित मतासांठी मदत करायचे ते आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. बदामीमध्ये सिद्धरामय्या यांच्या कुरुबा समाजाची मते असली तरी लिंगायत आणि नायक समाजाची तेथे जवळपास 50 टक्के मते आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात नायक समाजाचे श्रीरामलू यांना उभे केले होते. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatakकर्नाटकsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेस