शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 10:14 IST

Karnataka Election 2023 :  येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निकालात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार की काँग्रेस आणि जेडीएसकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, यंदा कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा होणार का? अशी चर्चा रंगली आहे. तर या विधानसभा निवडणुकीत जनता दल सेक्युलर किंग मेकरची भूमिका बजावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निकालात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार की काँग्रेस आणि जेडीएसकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कर्नाटकचा निवडणूक इतिहास पाहता 2007 नंतर सलग दोन वेळा येथे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली नाही. गेल्या 26 वर्षात येथील जनतेने नेहमीच विरोधी पक्षांना सत्ता दिली आहे. अशा स्थितीत भाजपक्षासमोर इतिहासाची दिशा बदलणे, हे यावेळी आव्हान असणार आहे. मात्र, काँग्रेस आणि जेडीएसनेही या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे. 

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गेल्या निवडणुकीत 224 जागांपैकी जवळपास 75 टक्के म्हणजे 158 पेक्षा जास्त जागांवर भाजपची थेट लढत होती. भाजपला याचा फायदा झाला.  त्यामुळेच सरकार स्थापन करण्यात यश आले. 2004 पर्यंत कर्नाटकात काँग्रेसची सत्ता होती. तोपर्यंत याठिकाणी काँग्रेस थेट रिंगणात उतरत होती आणि त्याचा फायदाही झाला. 

मात्र, यानंतर भाजपनेही निवडणुकीच्या रिंगणात थेट उतरण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेस आणि जेडीएस सोबत भाजप प्रबळ दावेदार तर बनलेच पण सरकारमध्येही आले. 2007 पासून आतापर्यंत 4 वेळा भाजपचे सरकार बनले आहे. त्याचवेळी जेडीएस आणि काँग्रेसला प्रत्येकी एकदा सत्तेत बसण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे 2004 पासून कर्नाटकात कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलेले नाही. 2013 मध्ये काँग्रेसने 122 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळीही काँग्रेस बहुमतासाठी एका जागेने कमी पडली.

लिंगायत समाजाची मते नेहमीच ठरली आहेत निर्णायक कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते नेहमीच निर्णायक ठरली आहेत. 50 ते 60 जागांवर त्यांचा थेट हस्तक्षेप आहे आणि इथे त्यांची मते विजय-पराजय ठरवतात. अशा स्थितीत भाजपच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लिंगायत समाजावर काँग्रेस आणि जेडीएस विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास भाजपला मोठा धक्का बसू शकतो. मात्र , हे शक्य दिसत नाही. 

सध्या लिंगायत समाज भाजपसोबत दिसतो आणि याचे प्रमुख कारण बीएस येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई हे स्वतः या समाजातून आलेले आहेत. मात्र, नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर हेही याच समाजातून आलेले असले तरी ते त्यांच्या समाजाशी असलेली युती मतांमध्ये रूपांतरित करू शकतील की नाही, हे सांगता येणार नाही. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक