शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Karnatak Politics : भाजपाने 'त्याला' 60 कोटी आणि मंत्रिपदाची दिली होती ऑफर, JDS आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 1:48 PM

Karnatak Politics : कर्नाटकमधील राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आमदार फोडण्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेस-जेडीएस आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपभाजपाने दिली होती ऑफर - जेडीएस आमदाराचा दावा

कर्नाटक - कर्नाटकमधील राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आमदार फोडण्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

''भाजपाकडून जेडीएस पार्टीतील एका व्यक्तीला 60 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीनं भाजपाची ऑफर नाकारली'', असा दावा गौडा यांनी केला आहे. कर्नाटकातील हस्सान येथे पत्रकार परिषद घेऊन गौडा यांनी ही धक्कादायक माहिती दिली. 

केएम शिवलिंगे गौडा यांनी सांगितले की, ''जेडीएसमधील एका व्यक्तीला माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते जगदीश शेट्टार यांनी 60 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती. संबंधित व्यक्तीनं भाजपाची ऑफर नाकारली आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना ऑफरबाबतची माहिती दिली''. गौडा यांनी केलेल्या दाव्यावर कर्नाटकात आता नवीन नाट्य घडण्याची चिन्हं आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेस-जेडीएसचे सरकार उलथवण्याचा भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसच्या 12 ते 15 आमदारांना राजीनामे द्यायला लावण्याचा डाव भाजपानं आखला होता. मात्र भाजपाचा हा डाव फसला. या पार्श्वभूमीवर, दोहोंकडून आपापले आमदार फुटू नयेत, यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाहीय. भाजपानं गेल्या काही दिवसांपासून आपल्या आमदारांना हरियाणातल्या गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये ठेवले होते.

याशिवाय काँग्रेसच्या चार आमदारांना मुंबईत ठेवण्यात आले होते. मात्र सरकार पाडण्यासाठी जेवढ्या आमदारांची आवश्यकता आहे, तितके आमदार राजीनामा देण्यास तयार नसल्याची जाणीव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना झाली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांना ऑपरेशन लोटस स्थगित करत असल्याची माहिती दिली. 

'एकाच वेळी काँग्रेस, जेडीएसच्या कमीत कमी 16 आमदारांनी राजीनामे द्यायला हवेत, असं पक्ष नेतृत्त्वानं म्हटलं होतं. त्यानुसार शनिवारपर्यंत काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी पक्ष सोडण्यास नकार दिला,' असं येडियुरप्पा यांनी हॉटेलमध्ये असलेल्या भाजपाच्या आमदारांना सांगितल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

दरम्यान, 15 जानेवारीला कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारचा दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. त्यातील एक आमदार भाजपाची पाठराखण करणार आहे. मात्र सरकार स्थिर असल्याचा दावा मुख्यमंत्री कुमारस्वामींनी केला आहे.एच. नागेश व आर. शंकर अशी त्या आमदारांची नावे आहेत. सध्याच्या आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठिंबा देण्याचे एच. नागेश यांनी ठरविले आहे. मी कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबा काढला असे आर. शंकर म्हणाले. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसBJPभाजपा